
India GST 2.0: जीएसटी 2.0 सुधारणा केल्याने नोव्हेंबरमध्ये वाहन विक्रीत २२% वाढ; वाढवला ग्राहकांचा विश्वास (फोटो सौजन्य: iStock)
India GST 2.0: केंद्र सरकारने जीएसटी सुधारणा लागू केल्याने नवीन जीएसटी २.० लागू करण्यात आली. त्यानंतर जीएसटी सुधारणांमुळे उच्च कर स्लॅब काढून टाकले. जीएसटी स्लॅबमध्ये कपात केल्याने ग्राहकांकडून मागणी आणि वापर प्रचंड वाढला. जीएसटी दरांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे किंमती कमी झाल्या, ज्यामुळे खरेदी वाढली आणि याचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली आणि दैनंदिन वस्तूंवरील कर देखील कमी केले. ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आराम मिळाला. त्यांच्या बचतीला या निर्णयाला हातभार लागला.
भारत अर्थ मंत्रालयाच्या मते, जीएसटी २.० चा परिणाम आता दिसून येत आहे. ग्राहकांकडून खरेदी वाढली आहे, विशेषतः ऑटोमोबाईल्स सारख्या क्षेत्रात खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच या कपातीमुळे जनतेचा विश्वासही वाढला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था वेगाने मजबूत होत आहे. भारतातील राज्यांसाठी देखील अधिक महसूल वाढला आहे. २०२५ नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत लक्षणीय वाढ झाली, तर उत्सवानंतरची मागणी देखील कायम राहिली. जीएसटी दरांमध्ये घट आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे वाहन विक्री वाढली होती. यामुळे ऑटोमोबाईल्स क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण होते.
एका अहवालानुसार, नोव्हेंबरमध्ये किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, घाऊक विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढून ४.१ लाख युनिट्सवर पोहोचली. शिवाय, जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे राज्यांच्या महसुलातही वाढ झाली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्य जीएसटी महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के जास्त होता. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान जीएसटी संकलन २०२४-२५ च्या याच कालावधीतील २,४६,१९७ कोटी रुपयांवरून वाढून सुमारे २,५९,२०२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.