इलॉन मस्क आता केकियस मॅक्सिमस नावाने ओळखले जाणार, वाचा...नेमकं का बदलले नाव?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत सध्या झपाट्याने वाढ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या निवडणुकीत जिंकल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्क यांची एकूण संपत्ती 313 अब्ज डॉलर इतकी आहे. ॲमेझॉनचे जेफ बेझोस 224 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
या वर्षी आतापर्यंत इलॉन मस्क कमाईत आघाडीवर आहे. 1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत त्यांनी 84.3 अब्ज डॉलर (सुमारे 7.12 लाख कोटी रुपये) कमावले आहेत. या वर्षी एनव्हीडियाचा जेसन हुआंग कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. जेसनने यावर्षी 80 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
मस्क एका सेकंदात किती कमावतात?
मस्क यांनी यावर्षी सुमारे 7.12 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई या वर्षातील ३२० दिवसांची कमाई मानली तर (नोव्हेंबरचे १४ दिवस आणि डिसेंबरचे ३१ दिवस वगळता) मस्क यांनी दररोज २२२६ कोटी रुपये कमावले आहेत.
अशा परिस्थितीत मस्क यांनी प्रत्येक तासाला 92.73 कोटी रुपये, प्रत्येक मिनिटाला 1.54 कोटी रुपये आणि प्रत्येक सेकंदाला सुमारे 2.58 लाख रुपये कमावले आहेत. म्हणजेच मस्क यांनी आपल्या देशातील उच्च पदावर असलेल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्याचा मासिक पगार केवळ एका सेकंदात मिळवला आहे.
२ लाख रुपये का नाही उचलणार मस्क?
समजा दोन लाख रुपये मस्क यांच्या रस्त्यात पडलेले असेल. तर ते ती रक्कम उचलण्यात आपला वेळ वाया घालवणार नाही. कारण ती रक्कम गोळा करायला किमान ४ किंवा ५ सेकंद लागतील. तितक्याच वेळात मस्क 10 लाख रुपयांहून अधिक कमाई करतात. अशी एलॉन मस्क यांची संपत्ती आहे.
मस्क यांची कमाई का वाढली?
ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर मस्क यांची प्रमुख कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 4 नोव्हेंबर रोजी टेस्लाच्या एका शेअरची किंमत 242.84 रुपये होती. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला आले. यामध्ये ट्रम्प विजयी झाले. ट्रम्प यांना विजयी करण्यात मस्क यांचेही मोठे योगदान आहे.
आता टेस्लाच्या शेअरची किंमत 320.72 रुपये इतकी आहे. म्हणजेच दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत टेस्लाचे शेअर्स 32 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.