फार्मा कंपनी देणार 21 रुपये अंतरिम लाभांश; शेअर्समध्ये 15 टक्के वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज!
फार्मा कंपनी आयपीसीए लॅबोरेटरीजने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर भागधारकांना 21 रुपये अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. याची रेकॉर्ड तारीख 25 नोव्हेंबर 2024 असणार आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी पात्र भागधारकांना लाभांश दिला जाईल.
प्रति शेअर 1765 रुपये लक्ष्य किंमत
शेअर्स आणखी 15 टक्क्यांनी वाढू शकतात. ब्रोकरेज शेअरखानने कंपनीच्या शेअर्सवर खरेदी रेटिंगची शिफारस केली आहे आणि प्रति शेअर 1765 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. ही किंमत 14 नोव्हेंबर रोजी बीएसईवरील शेअर्सच्या बंद किंमतीपेक्षा सुमारे 15 टक्के अधिक आहे. गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवार (ता.15) रोजी शेअर बाजार बंद होता.
हे देखील वाचा – बिझनेस सुरु करायचाय? सुरु करा ‘हे’ युनिट; दर महिन्याला होईल बक्कळ कमाई!
काय म्हटलंय शेअरखानने आपल्या अहवालात
शेअरखानने आपल्या संशोधन अहवालात म्हटले की, जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीत, आयपीसीए लॅबचा महसूल वार्षिक आधारावर 16 टक्के आणि तिमाही आधारावर 13 टक्के वाढून, 2,355 कोटी रुपये झाला आहे. निव्वळ नफा वार्षिक आधारावर 39 टक्के आणि तिमाही आधारावर 23 टक्क्यांनी वाढून, 245 कोटींवर पोहोचला आहे. EBITDA 441 कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 22 टक्के अधिक आहे. तर तिमाही आधारावर 12 टक्के अधिक आहे.
हे देखील वाचा – लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा… कितीये किंमत पट्टा!
जेनेरिक व्यवसायाचे एकत्रीकरण वाढीस
शेअरखानच्या मते, युनिकेम यूएसमध्ये बेशोरच्या जेनेरिक व्यवसायाचे एकत्रीकरण वाढीस चालना देईल. आंतरराष्ट्रीय महसूल सुधारणे आणि अलीकडील यूएस नियामक मंजूरी याद्वारे समर्थित. बायोलॉजिक्स आणि सीडीएमओ उपक्रमांमधील धोरणात्मक गुंतवणुकीमुळे वाढीची शक्यता आणखी वाढेल. अशा इतर बाबींचा विचार करून शेअरखानने शेअरसाठी खरेदी रेटिंग आणि लक्ष्य किंमत 1765 रुपये ठेवली आहे.
आयपीसीए लॅबोरेटरीजच्या शेअरची किंमत 14 नोव्हेंबर रोजी मुंबई शेअर बाजारात (ता.17) बीएसईवर 1536.95 रुपयांवर बंद झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 38,900 कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात शेअर्स 45 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)