देवेंद्र फडणवीस यांची भोसरीमध्ये प्रचारसभा (फोटो- ट्विटर)
पिंपरी-चिंचवड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथे बहजप-महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी फेक नरेटीव्हवरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली म्हेत्रे वस्ती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या काळात रेड झोन आणि निळ्या पूररेषेतील बांधकामांचा प्रश्न देखील सोडवला जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे ‘फेक नेरेटिव्ह’ शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे करत असून ‘फेक नेरेटिव्ह’ची यांच्याकडे फॅक्टरी आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.
कंपन्या बाहेर गेल्या हा ‘फेक नॅरेटिव्ह’….
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप वारंवार शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जात आहे. मात्र हा आरोप धादांत खोटा असून हे दोघे ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी आहे. गेल्या काही काळात असेही सांगितले गेले की हिंजवडीतील 36 कंपन्या बाहेर गेल्या याची मी माहिती घेतली. त्यानंतर असे दिसून आले महाविकास आघाडीच्या काळात 19 कंपन्यांनी आपले नवीन कॅम्पस सुरू केल. त्यांनी फक्त आपला विस्तार दुसरीकडे केला. पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर केला नाही. या ‘फेक नेरेटिव्ह’ च्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो 2014 ते 2019 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो .या काळात परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. 2020 -21 मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आज देशांतर्गत गुंतवणुकीची तुलना केल्यास कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र यांची गुंतवणूक 48 टक्के आहे.मात्र एकट्या महाराष्ट्राची गुंतवणुक 52 टक्के आहे. हे आकडे आरबीआयने जाहीर केलेले आहेत.
हेही वाचा:
मायक्रोसॉफ्टमुळे ५० हजार नोकऱ्यांची संधी…
देवेंद्र फडणवीस म्हणाले खरे तर खरे तर महाराष्ट्राची ही प्रगती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगायला हवी होती. मात्र रोज उठून हेच नेते महाराष्ट्र मागे पडत असल्याच्या फेक नेरेटिव्हला सेट करतात. गुजरातची भोंगे लावून प्रसिद्धी करतात. आगामी काळात पुणे जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल आणि ईव्ही इन्वेस्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रात युनिट सुरू केले असून या माध्यमातून पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना येथे हिवाळी अधिवेशनातच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महेशदादांना जनतेचा आशीर्वाद मिळणार,
भोसरी मतदारसंघात पुन्हा कमळ फुलणार..!🪷भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली, पुणे येथे भाजपा जाहीर सभेत उपस्थित होतो. यावेळी विराट संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
सर्वप्रथम जगद्गुरू… pic.twitter.com/jNeTF9zhDN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2024
जागे व्हा, छत्रपतींचे नाव घ्या. हे धर्म युद्ध आहे. एक रहेंगे तो सेफ रहेंगे एवढेच लक्षात ठेवा. आमदार महेश लांडगे यांना भरघोस मतांनी विजयी करा. महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रत्येक उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र