फोटो सौजन्य- सोशल मीडिया
एपिगामिया या FMCG चे सहसंस्थापक रोहन मिरचंदानी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते 41 वर्षाचे होते. रिपोर्ट्नुसार त्या 20 डिसेंबरच्या रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले मात्र तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. एपिगामिया हा भारतातील प्रमुक ग्रीक योगर्ट ब्रॅंड आहे. रोहन यांना 2023 मध्ये, त्यांना एपिगामियाचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले.
रोहन यांनी वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी यांनी व्यवसायात दैदिप्यमान यश मिळवले. त्यांनी NYS स्टर्न आणि हार्टन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. रोहन यांनी 2013 मध्ये ड्रम्स फूड इंटरनॅशनल ही स्टार्टअप कंपनी सुरु केली. एपिगामिया ही कंपनी ग्रीक योगर्ट, योगर्ट आणि शीतपेये तयार करते. एपिगामियाची सुरुवात ही आईस्क्रीम उत्पादनापासून झाली मात्र त्यानंतर ती योगर्ट ब्रँडमध्ये बदलली, कारण आइस्क्रीम व्यवसाय हा हंगामी व्यवसाय होता.
30 हून अधिक शहरांमध्ये 20,000 टचपॉइंट्स
कंपनीच्या रिपोर्ट्नुसार, डिसेंबर 2023 पर्यंत, ब्रँड 30 हून अधिक शहरांत 20,000 टचपॉइंट्सवर किरकोळ विक्री करत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 168 कोटी रुपयांची उत्पादने कंपनीकडून विकण्यात आली. ही विक्री आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी अधिक होती. कंपनी येत्या 2025-26 पर्यंत त्यांचा व्यवसाय आखाती देशांमध्ये नेण्याचा विचार करत आहे.
रोहन मिरचंदानी हे डिसेंबर 2023 मध्ये कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष बनले. दरम्यान कंपनीचे सह-संस्थापक असलेले राहुल जैन हे सीईओ बनले. तर, एपिगामियाचे संस्थापक सदस्य अंकुर गोयल यांना सीओओ म्हणजेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यावेळी गोयल कंपनीची पुरवठा विभागाचे काम पाहत होते.
एपिगामिया कंपनीत दीपिका पदुकोणची भागीदारी
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही एपिगामियाची स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. 2019 मध्ये, ती Epigamia मूळ कंपनी Drums Food International मध्ये सहयोगी झाली. या भागीदारीअंतर्गत दीपिकाने कंपनीत गुंतवणूक केली होती. ती एपिगामियाची ब्रँड ॲम्बेसेडर बनली.