Photo Credit- Social Media सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू नव्हे हत्या, राहुल गांधींचा आरोप
परभणी: परभणीतील रेल्वे स्थानकाबाहेर 10 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या काचेच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर हिंसाचाराच्या बातम्या आल्या होत्या. स्मारक पाडण्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरवादी सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला होता. मात्र, दोघांचाही वेगवेगळ्या परिस्थितीत मृत्यू झाला. सोपान दत्तराव पवार नावाच्या व्यक्तीने 10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकासमोरील आंबेडकर स्मारकाच्या काचा फोडून संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान केले होते. यानंतर लोकांनी पवार यांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाला पोलिसांनी अटक केली.
या घटनेच्या 12 दिवसानंतर राहुल गांधी आज (23 डिसेंबर) सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेतली. त्यांनी 20 ते 25 मिनिटे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. पम यावेळी त्यांनी पोलिसांवर आणि प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी हे दलित असल्याने त्यांची पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी म्हणाले, ” मी सोमनाथ सुर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल पाहिला, त्यांचे व्हिडीओही पाहिले, फोटोग्राफ पाहिले. ते पाहिल्यावर 99 नाही तर 100 टक्के सांगतो. त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता. ते दलित आहेत. ते संविधानाचे संरक्षण करत होते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच संविधान संपवण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आलं आहे. यामुळे या घटनेला मी त्यांचा हत्या करण्यात आल्याचे म्हणणार आहे.
Big Breaking: हायकोर्टाचा बडतर्फ IAS पूजा खेडकरला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला अन् अटकेपासून
ज्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते ही सुर्यवंशी याच्या हत्येसाठी जबाबदार आहेत. पोलिसांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
सोपान दत्तराव पवार नावाच्या व्यक्तीने 10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकासमोरील आंबेडकर स्मारकाच्या काचा फोडून संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान केले होते. यानंतर लोकांनी पवार यांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाला पोलिसांनी अटक केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी लोकांनी आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली होती. या बंदीच्या काळात हिंसाचार उसळला. यावेळी जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि लाठीचार्ज केला.
PV Sindhu Wedding : पीव्ही सिंधूने व्यंकट दत्ता साईसोबत बांधली लग्नगाठ
त्याच रात्री पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक केली होती. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सांगितले की, छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून सोमनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे 15 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.