गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; हा तगडा आयपीओ लवकरच खुला होणार, वाचा... काय आहे किंमत पट्टा!
शेअर बाजारात आज मोठी गटांगळी पाहायला मिळाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता आयपीओ कर्नाटकातील इथेनॉल कंपनी आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. Truealt Bioenergy ही कंपनी आपला 1000 कोटी रुपयांचा आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. कंपनी लवकरच आपल्या प्रस्तावित आयपीओचा मसुदा सेबीकडे सादर करणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
‘हे’ असतील आयपीओचे बँकर
उपलब्ध माहितीनुसार, IPO च्या तयारीचा भाग म्हणून, TrueAlt BioEnergy कंपनीने DAM Capital आणि SBI Capital यांना प्रस्तावित IPO चे बँकर म्हणून नियुक्त केले आहे. कंपनी IPO मध्ये नवीन शेअर्स जारी करण्याचा विचार करत आहे. यासोबतच कंपनीचे काही विद्यमान भागधारक आयपीओमध्ये त्यांचे शेअर्स विक्रीसाठी खुले करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : रतन टाटांचा एक निर्णय… चीनला देखील फुटला घाम; चीनची मक्तेदारी मोडीत काढणार!
वर्षभरात कंपनीच्या महसुलात 60 टक्क्यांनी वाढ
TrueAlt BioEnergy ही बेंगळुरू, कर्नाटक स्थित इथेनॉल उत्पादन करणारी कंपनी आहे. अलीकडच्या काळात कंपनीचा व्यवसाय झपाट्याने वाढला आहे. Acuite Ratings & Research नुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 1,225 कोटींवर पोहोचला आहे. जो त्यामागील वर्षी केवळ 768 कोटी होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीचा महसूल सुमारे 60 टक्क्यांनी वाढला आहे.
अलीकडेच झालीये कंपनीची स्थापना
कंपनीचे कामकाज सुरू होऊन अधिक काळ झालेला नाही. ट्रूअल्ट बायोएनर्जीची स्थापना मार्च 2021 मध्ये झाली. ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीचे काम प्रत्यक्षात सुरु झाले. अर्थात कंपनीने अवघ्या दीड वर्षात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलाचे लक्ष्य गाठले आहे. कंपनी कर्नाटकमध्ये 20 लाख लिटर इथेनॉल तयार करण्याची एकत्रित क्षमता असलेले तीन प्लांट चालवत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)