'या' देशात प्रत्येक 7 वा व्यक्ती बनलाय करोडपती; वाचा... कसे बनताय तेथील लोक श्रीमंत!
युरोप खंडातील स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला देश असण्यासोबतच स्वित्झर्लंडची आणखी एक खास ओळख आहे. येथे मोठ्या संख्येने करोडपती नागरिक राहतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करताना ‘उद्योजक दर्शन’ने स्वित्झर्लंड या देशाबद्दल मनोरंजक गोष्टी नमूद केल्या आहेत.
उद्योजक दर्शनच्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडमधील प्रत्येक सातवा प्रौढ व्यक्ती करोडपती आहे. विशेष म्हणजे कोट्यधीशांच्या संख्येत वाढ होण्यामध्ये, स्वित्झर्लंड हा देश अमेरिकेपेक्षा 5 पट अधिक वेगाने कार्यरत आहे. काही चांगल्या आर्थिक पद्धतींमुळे या देशातील लोक करोडपती झाले आहेत. असे ‘उद्योजक दर्शन’ने म्हटले आहे.
हेही वाचा : मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
कसे बनताय स्वित्झर्लंडचे नागरिक कोट्यधीश?
1. घरापेक्षा गुंतवणुकीला देतात अधिक महत्त्व : अमेरिकेसारख्या देशात स्वत:चे घर घेण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये वाढत आहे. अमेरिकेतील 65 टक्के प्रौढ लोकसंख्येकडे स्वतःचे घर आहे. याउलट स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाण ४१ टक्के आहे. या देशात लोक घर खरेदी करत, मोठी गुंतवणूक करण्याऐवजी विविध आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात.
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
२. बचतीसाठी अवलंबतात विशेष पद्धत : सामान्यतः प्रत्येक कुटुंब मासिक खर्चानंतर वाचवलेली रक्कम बचत म्हणून ठेवते. त्याच वेळी एक सामान्य स्विस कुटुंब महिन्याच्या सुरुवातीला आपल्या कमाईतील 20 ते 30 टक्के रक्कम बचतीसाठी ठेवते आणि उर्वरित पैशाने महिन्याचा खर्च चालवते.
हेही वाचा : पुढील आठवड्यात खुले होणार ‘हे’ दोन तगडे आयपीओ; पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
३. कुशल गुंतवणुकीला देतात प्राधान्य : स्वित्झर्लंडमध्ये लोक प्रामुख्याने शिक्षणावर खर्च करतात. विशेष म्हणजे ते केवळ पदवी मिळवण्यावरच नव्हे तर कौशल्ये विकसित करण्याकडे अधिक लक्ष देतात. एक स्विस व्यक्ती त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 ते 10 टक्के वैयक्तिक विकासासाठी खर्च करतो. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम त्याच्या पगारावर आणि कामावर दिसून येतो.
४. वेगवेगळ्या बँकांमध्ये करतात गुंतवणूक : स्विस व्यक्ती गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना स्थानिक बँका तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमार्फत परकीय चलनात गुंतवणूक करायला आवडते. याशिवाय, गुंतवणूक करताना, स्विस लोक दीर्घकालीन परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
५. वेगवेगळ्या योजनांमध्ये करतात गुंतवणूक : स्वित्झर्लंडमध्ये लोक वेगवेगळ्या बँकांमध्येच गुंतवणूक करत नाहीत तर वेगवेगळ्या योजनांमध्येही देखील गुंतवणूक करतात.