पुढील आठवड्यात खुले होणार 'हे' दोन तगडे आयपीओ; पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
ई-कॉमर्स कंपनी फर्स्टक्राय आणि यूनिकॉमर्स ई-सोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांचे आयपीओ 6 ऑगस्टला उघडतील आणि 8 ऑगस्टला बंद होणार आहे. अँकर गुंतवणूकदार 5 ऑगस्टला सबस्क्रिप्शनसाठी अर्ज करू शकणार आहेत. फर्स्टक्रायची आयपीओ साईज 4,194 कोटी रुपये असणार आहे. तर यूनिकॉमर्स ई-सोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओची लॉट साईज 276 कोटी रुपये असणार आहे.
हेही वाचा : …बंद होणार महिलांसाठीच्या ‘या’ योजना; अर्थसंकल्पात झाली होती घोषणा; वाचा… नेमकं कारण!
4,194 कोटींचा असेल फर्स्टक्राय आयपीओ
फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबिझ सोल्युशन्स लिमिटेडने तिच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (आयपीओ) 440 ते 465 रुपये प्रति शेअर किंमत पट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा आयपीओ 6 ऑगस्ट रोजी आयपीओ खुला होणार आहे. तीन दिवसांच्या कालावधीनंतर हा आयपीओ 8 ऑगस्ट रोजी बंद होईल. पुणेस्थित ब्रेनबिझ सोल्युशन्सच्या प्रस्तावित आयपीओमध्ये 1,666 कोटी रुपयांचे नवे शेअर्स आणि 2,528 कोटी रुपयांचे 5.44 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) मध्ये असणार आहेत. अर्थात या आयपीओचा आकार 4,194 कोटी रुपये इतका असणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
276 कोटींचा असेल यूनिकॉमर्स आयपीओ
सॉफ्टबँक समर्थित युनिकॉमर्स ई सोल्यूशन्स लिमिटेडच्या 276 कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची (आयपीओ) किंमत 102 ते 108 कोटी रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ 6 ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. तर 8 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित आहे. त्यामुळे यातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न विक्री करणाऱ्या शेअरधारकांना दिले जाणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)