जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा... मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?
भारतासह आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मात्र, आता आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे स्थान धोक्यात आले आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी 114 अब्ज डॉलर संपत्तीसह आशियामध्ये प्रथम स्थानी तर जगात 11व्या क्रमांकावर आहे. मात्र, आता आशियातील त्यांचे पहिले स्थान लवकरच दुसरा व्यक्ती काबीज करू शकतो.
गौतम अदानींची संपत्तीत 2.90 अब्जने वाढ
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ तीन अब्ज डॉलर्सचा फरक शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता केव्हाही गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात. गौतम अदानी हे १११ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांमध्ये दुसऱ्या आणि जगात १२ व्या क्रमांकावर आहे. यावर्षी अंबानींच्या एकूण संपत्तीत 17.7 अब्जने वाढ झाली आहे. तर अदानींची एकूण संपत्ती 26.9 अब्जने वाढली आहे. गुरुवारी, अंबानींची संपत्ती 687 दशलक्षने वाढली याउलट गौतम अदानींची संपत्ती 2.90 अब्जने वाढली. त्यामुळे आता दोघांच्या संपत्तीत केवळ तीन अब्ज डॉलर्सचा फरक आहे.
हेही वाचा : मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
अमेरिकी शेअर बाजार घसरणीचा परिणाम
गुरुवारी (ता.१) अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे बहुतांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांची एकूण संपत्ती 10.9 अब्ज डॉलरने घसरून, 241 अब्ज डॉलरवर खाली आली आहे. जेफ बेझोस 2.48 अब्ज डॉलर आणि बर्नार्ड अर्नॉल्ट 3.40 डॉलर अब्ज गमावले. या यादीत बेझोस 207 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या तर अर्नॉल्ट तिसऱ्या स्थानावर आहेत.
मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत ७.९९ अब्ज डॉलरने वाढ
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत गुरुवारी ७.९९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. ते 177 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 157 अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आहेत. गुरुवारी, त्यांची एकूण संपत्ती 390 दशलक्ष डॉलरने वाढली आहे.
हेही वाचा : ‘ही’ तरुणी सांभाळणार टाटा समूहाची धुरा; वाचा… काय आहे रतन टाटांसोबत तिचे नाते!
अनेक श्रीमंतांच्या संपत्तीत घट
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सहाव्या ते दहाव्या क्रमांकावर असलेल्या सर्व अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेजने 277 दशलक्ष डॉलर गमावले असून, त्याची एकूण संपत्ती 153 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. लॅरी एलिसनने 1.87 अब्ज डॉलर गमावले, स्टीव्ह बाल्मरने 321 दशलक्ष डॉलर गमावले, सेर्गे ब्रिनने 238 दशलक्ष डॉलर गमावले आणि वॉरन बफेने 2.28 अब्ज डॉलर गमावले. त्याच प्रमाणे मायकेल डेल यांना 4.49 अब्ज डॉलर आणि एनव्हीडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग यांना 6.83 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.