Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानी समूहाकडून साम्राजाचा विस्तार; 8100 कोटींमध्ये ओरिएंट सिमेंट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा!

अदानी समूहाची कंपनी असलेल्या अंबुजा सिमेंटने ओरिएंट सिमेंट कंपनीचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे अदानी सिमेंटचा बाजारहिस्सा 2 टक्क्यांनी वाढणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 22, 2024 | 03:21 PM
अदानी समूहाकडून साम्राजाचा विस्तार; 8100 कोटींमध्ये ओरिएंट सिमेंट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा!

अदानी समूहाकडून साम्राजाचा विस्तार; 8100 कोटींमध्ये ओरिएंट सिमेंट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा!

Follow Us
Close
Follow Us:

अदानी समूहाची कंपनी असलेल्या अंबुजा सिमेंटने ओरिएंट सिमेंट कंपनीचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. सिमेंट उद्योग क्षेत्रातील कंपनीचा दबदबा वाढला आहे. या संपादनासाठी अंबुजा सिमेंट 8100 कोटी रुपये खर्च करणार आहे. कंपनी तिच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून ही खरेदी पूर्ण करणार आहे. या संपादनानंतर, अदानी सिमेंटची एकूण परिचालन क्षमता वार्षिक ९७.४ एमटीपीए टन असेल आणि कंपनी मार्च २०२५ पर्यंत तिची उत्पादन क्षमता १०० दशलक्ष टनांपर्यंत वाढवणार आहे.

अदानी सिमेंटचा बाजार हिस्सा २ टक्क्यांनी वाढला

स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये माहिती देताना अंबुजा सिमेंट कंपनीने म्हटले आहे की, ओरिएंट सिमेंटच्या अधिग्रहणामुळे अंबुजा सिमेंटला दक्षिण आणि पश्चिम भारतात त्यांची उत्पादन क्षमता वार्षिक 8.5 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्यास मदत होणार आहे. तसेच अदानी सिमेंटचा बाजारहिस्सा 2 टक्क्यांनी वाढणार आहे. दरम्यान, सध्या शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीमुळे अंबुजा सिमेंटचा शेअर १.४९ टक्क्यांच्या घसरणीसह ५६३.१५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

हे देखील वाचा – टाटा सन्सचा आयपीओ कधी खुला होणार? समोर आली मोठी महिती अपडेट; टाटा ग्रुपचे शेअर्स वधारले!

3 ते 4 महिन्यांत अधिग्रहण पूर्ण होणार

नियामक फाइलिंगमध्ये माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, ओरिएंट सिमेंट लिमिटेडच्या 37.90 टक्के समभागांचे 7,76,49,413 इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय, कंपनी 8.90 टक्के स्टेक देखील विकत घेईल जे 1,82,23,750 इक्विटी शेअर्सच्या समतुल्य आहे. याशिवाय, अंबुजा सिमेंट ओरिएट सिमेंटच्या विद्यमान भागधारकांकडून 26 टक्के स्टेक अंतर्गत 5,34,19,567 शेअर्स 395.40 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्याची खुली ऑफर दिली आहे. हे अधिग्रहण पुढील 3 ते 4 महिन्यांत पूर्ण होईल, असेही अंबुजा सिमेंट कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

2028 पर्यंत 140 दशलक्ष टनांचे उद्दिष्ट

ओरिएंट सिमेंटच्या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंटची वार्षिक क्षमता 2025 पर्यंत 100 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल. कंपनीने 2028 पर्यंत ते 140 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यापूर्वी, अदानी समूहाने डिसेंबर 2023 मध्ये सांघी सिमेंट लिमिटेडचे ​​अधिग्रहण केले होते. यावर्षी समूहाने पेन्ना सिमेंट खरेदीची घोषणाही केली होती. या संपादनाबाबत अंबुजा सिमेंटचे संचालक करण अदानी म्हणाले आहे की, योग्य वेळी केलेल्या या संपादनामुळे अंबुजा सिमेंटच्या वाढीला गती मिळण्यास मदत होईल आणि दोन वर्षांत क्षमता 30 दशलक्ष टनांनी वाढवता येईल.

Web Title: Expansion of empire by adani group announcement of the acquisition of orient cement company for 8100 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • Adani Group

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.