Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?

India's Top Philanthropists 2026: 'एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रोपी लिस्ट 2026' नुसार, HCL चे संस्थापक शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने 2025-26 या आर्थिक वर्षात 2,593 कोटी रुपयांचे दान करून देशातील सर्वात मोठे दानशूर म्हणून अव्वल स्थान कायम राखले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 21, 2026 | 10:53 AM
adani ambani (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

adani ambani (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शिव नाडर कुटुंब देशातील सर्वात मोठे दानशूर; 2,593 कोटींचे दान.
  • गौतम अदानी दुसऱ्या, तर बजाज कुटुंब तिसऱ्या क्रमांकावर.
  • शिक्षणासाठी सर्वाधिक 4,188 कोटींचा निधी.

भारतीय उद्योगजगतातल्या मोठ्या माणसांनी समाजासाठी किती पैसे दिले, याचा नवा अहवाल समोर आला. ‘एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रोपी लिस्ट 2026’ नुसार, HCL चे संस्थापक शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने देशातले सगळ्यात मोठे दानशूर होण्याचा मान परत एकदा मिळवला आहे. India’s Top Philanthropists 2026:

2025-26 या आर्थिक वर्षात नाडर कुटुंबाने वेगवेगळ्या सामाजिक कामांसाठी तब्बल 2,593 कोटी रुपयांचा निधी दिला. दुसरीकडे उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या देणग्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 127 टक्क्यांची मोठी वाढ झाली. त्यामुळे ते या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहोचलेत.

कोणी किती दिलं?

अहवालातल्या आकड्यांनुसार गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने 2025-26 मध्ये 877 कोटी रुपयांचं सामाजिक योगदान दिले. या यादीत बजाज कुटुंबाने आपलं तिसरं स्थान कायम ठेवलंय. त्यांनी मागच्या वर्षीपेक्षा 42 टक्के जास्त म्हणजे 632 कोटी रुपये दान केलेत. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी या यादीत चौथ्या नंबरवर असून त्यांच्या कुटुंबाच्या देणग्यांमध्ये 1 टक्क्यांची थोडी घट होऊन ती रक्कम 620 कोटी रुपयांवर थांबली.

पूनावाला आणि मेहता कुटुंबाची मोठी उडीसायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी एकत्रितपणे 336 कोटी रुपयांचं योगदान दिलं. त्यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 94 टक्क्यांची वाढ झाली. तसेच सुधीर मेहता आणि समीर मेहता यांच्या देणग्यांमध्ये 77 टक्के वाढ होऊन हा आकडा 334 कोटी रुपयांवर गेला.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोनं 5,120 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीच्या दरातही 5 हजारांची घसरण… जाणून घ्या

इन्फोसिस वाल्यांनी मिळून किती दिलं?

तसेच नंदन निलेकणी, रोहिणी निलेकणी, एस. गोपालकृष्णन, के. दिनेश, कुमारी शिबुलाल आणि एन. आर. नारायण मूर्ती या इन्फोसिसशी संबंधित लोकांनी मिळून एकूण 920 कोटी रुपये सामाजिक कामासाठी दिले. तसेच 219 लोकांनी मिळून 11,554 कोटी दिले. यंदाच्या यादीत देशभरातले एकूण 219 दानशूर लोक आहेत.

या सगळ्यांनी 2025-26 मध्ये मिळून 11,554 कोटी रुपयांचा निधी समाजाच्या कामासाठी दिला. मागच्या आर्थिक वर्षातल्या 10,380 कोटी रुपयांच्या तुलनेत एकूण दानात 11 टक्क्यांची वाढ झाली. या यादीतल्या 19 लोकांनी 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, 32 लोकांनी कमीत कमी 50 कोटी रुपये, तर 80 लोकांनी 20 कोटी रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचं दान दिलं.

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज

पैसा गेला कुठे? शिक्षण आणि आरोग्याला सगळ्यात जास्त

सामाजिक दानाचा पैसा कोणत्या क्षेत्रासाठी वापरला गेला, हे बघितलं तर शिक्षण क्षेत्राला सगळ्यात जास्त प्राधान्य मिळाल्याचं दिसतं. एकूण निधीपैकी जवळपास 36 टक्के म्हणजे 4,188 कोटी रुपये शिक्षणाच्या विकासासाठी खर्च झाले आहेत. आरोग्य सेवांसाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांमध्ये पण 82 टक्क्यांची मोठी वाढ होऊन हा निधी 1,768 कोटी रुपयांवर पोहोचला.

याशिवाय कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी 1,377 कोटी रुपयांची मदत मिळाली. यातले 1,220 कोटी रुपयांचा मोठा वाटा एकट्या शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाचाच आहे. म्हणजे थोडक्यात, श्रीमंत लोक आता फक्त कमवत नाहीत, तर समाजासाठी पण मोठ्या प्रमाणात देतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 च्या भारतातील सर्वात मोठ्या दानशूर व्यक्ती कोण आहेत?

    Ans: शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब 2,593 कोटी रुपयांच्या दानासह पहिल्या क्रमांकावर आहेत.

  • Que: गौतम अदानी यांनी किती रुपयांचे दान केले?

    Ans: गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने 877 कोटी रुपयांचे सामाजिक योगदान दिले.

  • Que: मुकेश अंबानी यांनी किती दान केले?

    Ans: मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने 620 कोटी रुपयांचे दान केले.

Web Title: India top philanthropists 2026 shiv nadar adani ambani donations rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Adani
  • Adani Group
  • Ambani Group
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Gaza News : हिवाळी पावसाने गाझातील विस्थापितांचे हाल; हजारो तंबू पाण्याखाली, दीड लाखांहून अधिक तंबू सीमेवर अडकले
1

Gaza News : हिवाळी पावसाने गाझातील विस्थापितांचे हाल; हजारो तंबू पाण्याखाली, दीड लाखांहून अधिक तंबू सीमेवर अडकले

World News : हंगेरीला पुन्हा फुटबॉल महासत्ता बनवण्याचे स्वप्न; फुटबॉलवेड्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी मोहीम
2

World News : हंगेरीला पुन्हा फुटबॉल महासत्ता बनवण्याचे स्वप्न; फुटबॉलवेड्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी मोहीम

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे
3

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील
4

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.