फॅशन ब्रँड पर्पल युनायटेडचा आयपीओ 11 डिसेंबरला उघडणार; वाचा... कितीये किंमत पट्टा!
शेअर बारातील गुंतवणूकदार अनेक दिवसांपासून टाटा सन्सच्या आयपीओची वाट पाहत आहेत. आता हा आयपीओ येण्याची शक्यता बळावली आहे. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(आरबीआय) टाटा सन्सला स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्यापासून सूट देण्याची टाटा समूहाची विनंती नाकारली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
हे देखील वाचा – …या आठवड्यात ‘हे’ तीन जबरदस्त आयपीओ येणार; पैसे कमवण्याची गुंतवणूकदारांना मोठी संधी!
टाटा केमिकल्स शेअर्समध्ये वाढ
सोमवारी (ता.21) व्यापार सत्रात सर्वात मोठी वाढ टाटा समूहाच्या टाटा केमिकल्स शेअरमध्ये दिसून आली. दिवसाच्या व्यापारात हे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले. बाजार बंद होताना टाटा केमिकल्सचा शेअर 8.73 टक्क्यांच्या उसळीसह 1183 रुपयांवर बंद झाला. टाटा इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक वाढले. पण बंद होईपर्यंत हा शेअर 3.60 टक्क्यांनी वाढून 7059.80 रुपयांवर बंद झाला. याशिवाय तेजस नेटवर्क 11.04 टक्क्यांच्या वाढीसह आणि टाटा कॉफी 3.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
किती आहे टाटा सन्सचे मूल्य
आरबीआयच्या या निर्णयानंतर टाटा समूहाला टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करावे लागणार आहे. आरबीआयने टाटा सन्सचे अप्पर लेयर एनबीएफसी म्हणून वर्गीकरण केले आहे. अशा सर्व कंपन्या ज्यांना RBI वरच्या स्तरावरील NBFCs मानते. त्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करावे लागेल.
दरम्यान, टाटा सन्सचे मूल्य सुमारे 11 लाख कोटी रुपये आहे. कंपनीने आयपीओमधील 5 टक्के स्टेक देखील विकला आहे. तर आयपीओचा आकार 55,000 कोटी असू शकतो. हा ह्युदांई मोटर इंडियाच्या 27,870 कोटी रुपयांच्या आयपीओ पेक्षाच्या मोठा असेल.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)