Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज 'हे' शेअर्स पालटणार तुमचं नशिब! बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस
मंगळवारी, अमेरिका-इराण युद्धातील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २२,९०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स १,३७२.०६ अंकांनी, म्हणजेच १.८९ टक्क्यांनी वाढून ७४,०६८.४५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३९९.७५ अंकांनी, म्हणजेच १.७८ टक्क्यांनी वाढून २२,९१२.४० वर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १,१६७.९० अंकांनी किंवा २.२७ टक्क्यांनी वाढून ५२,६०५.६५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
निओट्रेडरचे सहसंस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. राजा व्यंकटरमण यांनी शिफारस केल्यानुसार आज गुंतवणूकदार इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो), ग्रॅन्युल्स इंडिया लिमिटेड, ल्युपिन लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड हे शेअर्स खरेदी करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांच्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया), स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, ग्रॅन्युल्स इंडिया आणि अलिव्हस लाइफ सायन्सेस हे शेअर्स खरेदी करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये अंबुजा सिमेंट्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पर्सिस्टंट सिस्टम्स यांचा समावेश आहे.






