two youths tease elephant ( दोन तरुण हत्तीला छेडतात )
मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही व्हिडिओ ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यातील हिंडोल वनक्षेत्रातील करणपूर भागातील असल्याचे सांगितले जात आहेत.यात एक व्हिडिओ डेंगबोरेई गावाजवळील असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरा व्हिडिओ पाटला गावातील सांगितले जात आहेत.या व्हिडिओमध्ये दोन तरुण एका जंगली हत्तीच्या अगदी जवळ जाऊन त्याला त्रास देताना दिसत आहेत. कधी ते त्याची शेपटी ओढतात, तर कधी त्याच्या सोंडेला हात लावून स्पर्श करत आहेत.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by Wildlife with Ansuman (@wildlifewithansuman)
एका हत्तीसारख्या मोठ्या आणि शक्तिशाली प्राण्याच्या इतक्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. स्थानिक लोक या हत्तीला “तुंगुरु” म्हणतात. असे माहिती मिळते. हा हत्ती गेल्या काही महिन्यांपासून हिंदोल परिसरात फिरत आहे. तो गावाच्या मध्यभागापासून शाळेच्या आवारापर्यंत फिरतो.
या हत्तीने आतापर्यंत कोणतीही मनुष्य हानी केली नसून हा हत्ती आतापर्यंत शांत असला तरी, त्याला चिथावणी देणे किंवा त्याच्या शरीराच्या कोणताही भागाला ओढणे हे जीवघेणे ठरू शकते.
अशा कृतीमुळे जंगली हत्ती अचानक आक्रमक होऊ शकतो, यामुळे कोणालाही प्रतिक्रिया देता येत नाही. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओंमुळे, वन्यजीवांप्रति लोकांच्या वागणुकीबद्दल आणि सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन्य प्राण्यांसोबत असे धोकादायक वर्तन केवळ माणसांसाठीच धोकादायक नाही, तर त्यामुळे प्राण्यांनाही ताण आणि त्रास होऊ शकतो.






