
Faster Tax Refunds: CBDT's big decision! (फोटो सौजन्य - iStock)
Faster Tax Refunds: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. कर भरताना परतफेड, टीडीएस आणि व्याज मोजणीतील चुका दुरुस्त करण्यासाठी धावपळ करत जाण्याची आता करदात्यांना आवश्यकता नाही. कारण, सीपीसीला विशेष अधिकार देण्यात आले आहे. जे कर परताव्यातील त्रुटी दुरुस्त करतील. ही सुविधा जलद आ/णि अधिक परस्परसंबंधित होत असल्याने तक्रारींचे निराकरण जलद गतीने होतील.
प्राप्तिकर विभाग एका सामान्य समस्येने त्रस्त असतो. कर दात्यांनी रिटर्न भरल्यानंतरही, चुकीच्या कर मागणी सूचना मिळतात किंवा चुकीच्या गणनेमुळे त्यांची परतफेड थांबवली जाते. या चुकांना दुरुस्त करायला अधिक वेळ लागतो. मूल्यांकन अधिकारी (एओ) आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) यांच्यामध्ये समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिक वेळ फायलींची देवाणघेवाण होते. त्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने आता ही प्रकिया सोपी करण्यासाठी आणि दुरुस्ती जलद गतीने होण्यासाठी एक उपाययोजना केली आहे.
हेही वाचा : Trump’s Tariff Gift: ट्रम्पची मोठी घोषणा! टॅरिफमधून मिळणारा पैसा थेट अमेरिकन नागरिकांच्या खात्यात?
बेंगळुरूमधील प्राप्तिकर आयुक्त (सीपीसी) यांना २७ ऑक्टोबरला सीबीडीटीकडून विशेष अधिकार देणारी महत्वाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिकाराअंतर्गत सीपीसी आता एओ द्वारे प्रक्रियेत महत्वाच्या असलेल्या सर्व लहान-मोठ्या संगणकीयसह लेखा त्रुटी सुद्धा थेट दुरुस्त करू शकतात.
करदात्यांना कसा होईल फायदा?
यापूर्वी जर करदात्यांचा टीडीएस योग्यरित्या जोडला गेला नसेल किंवा आगाऊ कर जुळत नसेल, व्याज चुकीचे मोजले जात असले तर एओच्या कार्यालयात करदात्याला वारंवार जाऊन धावपळ करावी लागत असे. जेव्हा सीपीसीकडे एओ फाइल पाठवण्यात येई तेव्हा एओकडून सीपीसी त्याचे स्पष्टीकरण मागत असे. आणि यासगळ्या प्रक्रियेला दीर्घ वेळ लागत असे. त्यामुळे करदात्यांचे हाल होत, हेच टाळण्यासाठी आता सीपीओला विशेष अधिकार देण्यात आले. या नव्या नियमात केंद्रीय सार्वजनिक लेखा अधिकारी टीडीएस किंवा टीसीएस जर जुळत नसेल तर आगाऊ कर अथवा स्व-मूल्यांकन कराचे निरीक्षण किंवा पूर्वी जारी केलेल्या परताव्यांमधील त्रुटी थेट ते दुरुस्त करू शकतात. कलम १५६ अंतर्गत आवश्यक असल्यास मागणी सूचना सुद्धा जारी करू शकतील.
हेही वाचा : Tomorrow Bank Holiday: ‘या’ राज्यातील बँक राहणार बंद, RBI ना का दिली 11 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, किरकोळ चुका दुरुस्त करण्यासाठी करदात्यांना आता धावपळ किंवा वारंवार कार्यालयात जायची आवश्यकता नाही. कारण, आताची नवी प्रणाली जलदगतीने आणि अधिक परस्परसंबंधित असल्याने काम सोपे होईल. हा बदल जनतेसाठी दिलासा असून यामुळे सीपीसी आता थेट ऑर्डर दुरुस्त करत असल्याने काही दिवसांत संबधित सुधारणा पूर्ण होतील. ज्या त्रुटी दुरुस्त करायला दोन ते सहा महिने लागत होते आता ते त्याआधी पूर्ण होतील.