Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळ्यांनाच दणका… Zepto पासून IRCTC किचन! FDA ची मोठी कारवाई; 6 मोठ्या ब्रँड्सचे परवाने थेट रद्द!

FDA Action On Zepto And IRCTC :अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने FDA कडक पाऊल उचलले आहे. रेल्वे प्रवाशांना अन्न पुरवणाऱ्या IRCTC च्या बेस किचनपासून ते १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या Zepto सह एकूण ६ कंपन्यांचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 09, 2026 | 01:41 PM
Zepto पासून IRCTC किचन! FDA ची मोठी कारवाई

Zepto पासून IRCTC किचन! FDA ची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • Zepto पासून IRCTC किचन!
  • FDA ची मोठी कारवाई
  • 6 मोठ्या ब्रँड्सचे परवाने थेट रद्द!
FDA Action On Zepto And IRCTC : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने कारवाईचा धडाका लावलेलाच आहे. नुकतीच अन्न सुरक्षेसंदर्भात मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या नियमांमध्ये हलगर्जीपणा आढळल्याने मुंबईतील सहा मोठ्या ब्रँड्सचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये झेप्टोच्या मालाड येथील परिसराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुण्यातील 12 ब्रँड्सवर कारवाई करण्यात आली आहे. नेमका कोणाकोणाचा यात समावेश आहे? काय आहे नेमकं प्रकरण? ( FDA Action On Zepto And IRCTC ) 

Govt New Scheme : ‘जेव्हा पैसे असतील तेव्हा भरा, आणि Pension मिळवा!’ केंद्र सरकार आणतेय भन्नाट योजना!

महाराष्ट्र एफडीएने ८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणची तपासणी केली. तपासणीदरम्यान, अनेक ठिकाणी स्वच्छता, अन्न हाताळणी, तापमान नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट परवाने रद्द करण्यात आले आहेत.

IRCTC चं बेस किचनही टार्गेटवर

रेल्वे प्रवाशांना जेवण देणारी IRCTC ची बेस किचन्स आणि फूड प्लाझादेखील FDA च्या रडारवर आहे. एकूण पाच ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यापैकी, कुर्ला पश्चिम येथील आर. के. असोसिएट्स अँड हॉटेलियर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला, तर चार आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तपासणीदरम्यान, कुर्ला येथील बेस किचनमध्ये झुरळांचा वावर, उघड्यावर अन्न साठवणे, उघड्या कचऱ्याजवळ अन्न तयार करणे आणि स्वयंपाकघराची दयनीय अवस्था यांसारखा धक्कादायक प्रकार आढळून आला. याचा अर्थ असा की, ज्या ठिकाणी अन्न तयार केले जाते आणि प्रवाशांना दिले जाते, त्याच ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नव्हतं. त्यामुळे मोठा धोका दाखवत थेट कारवाई करण्यात आली.

Zepto बाबतही बरेच प्रश्न

FDA ला मालाड पश्चिम येथील Drogheria Sellers Pvt. Ltd. Zepto च्या आवारात गंभीर त्रुटी आढळून आल्या. तपासणीत मोठ्या संख्येने झुरळे, सदोष कोल्ड चेन, अस्वच्छ गटार आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेतील त्रुटी उघड झाल्या.

सर्वात मोठी तफावत नाशवंत खाद्यपदार्थांच्या तापमानाबाबत आढळून आली. दूध, चीज आणि दही यांसारखे पदार्थ १४-१५ अंश सेल्सिअस तापमानात साठवले जात होते, तर ते २ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे आवश्यक असते. यानंतर, FDA ने तात्काळ झेप्टोच्या आवाराचा परवाना निलंबित केला. विक्री, साठवणूक, वितरण आणि ऑनलाइन ऑर्डरची पूर्तता यावरही बंदी घालण्यात आली.

मातेश्वरी मिल्कचा लायसन्स सस्पेंड

खारघर येथील मातेश्वरी मिल्कला देखील दणका बसला आहे. यामध्ये देखील बरेच त्रुटी जाणवत आहेत. दुधाच्या तापमानावर नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी यासंबंधीच्या नियमांचे पालन केले जात नव्हते.

FDA च्या मते, ग्राहकांना दिलेल्या तपशिलात आणि दुधाच्या टाक्यांवरील माहितीत तफावत आढळून आली. इतकेच नव्हे तर, पाश्चरायझेशनची सुविधा नसतानाही पाश्चराइज्ड दुधाचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले. ७ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली, ज्यानंतर परवाना निलंबित करण्यात आला.

जुहूच्या ISKCON वर कारवाई

इस्कॉन जुहू कॅम्पसमधील तीन फुड युनिट्सदेखील FDA च्या कारवाईतून सुटले नाहीत. पाण्याच्या नियमित गुणवत्ता तपासणीच्या नोंदी गहाळ असल्याचे आढळले. त्याचबरोबर कच्चे आणि तयार अन्न अयोग्यरित्या साठवलेले आढळले आहे. तपासणीत कीटकांचा प्रादुर्भाव, स्वच्छतेतील हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणासंबंधी नोंदींचा अभाव असल्याचेही उघड झाले. या त्रुटींनंतर, तिन्ही अन्न युनिट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.

पुण्यातील १२ ठिकाणी कारवाई

FDA ने पुणे विभागातील अन्न सुरक्षेबाबतही कारवाई केली. एकूण १२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी, ‘आदिती व्हेज’ वैध अन्न परवान्याशिवाय कार्यरत असल्याचे आढळल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, काका वडा पाव, क्रिस्टल गोरमेट, गुरुकृपा चिकन प्लांट, हॉटेल यशराज, श्री गणेश हॉटेल, हॉटेल सह्याद्री, सावनगिरी लोणी डोसा, गोल्डन चाहा, जॅक्सन डेअरी आणि खडा वडा पाव सेंटर यांसह ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

FDA चा कठोर कारवाईचा इशारा

FDA ने स्पष्ट केले आहे की, अन्न व्यवसायात गुंतलेल्या सर्व आस्थापनांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केल्यास कारवाई केली जाईल. हॉटेल असो, डेअरी असो, ऑनलाइन डिलिव्हरी वेअरहाऊस असो किंवा रेल्वे बेस किचन असो, अन्न सुरक्षेतील निष्काळजीपणा आता महागात पडू शकतो. एफडीएने संकेत दिले आहेत की, येत्या काही दिवसांत अशा आस्थापनांची तपासणी आणि कारवाई सुरू राहील.

आता दुर्गम भागातही मिळणार हाय-स्पीड इंटरनेट! Elon Musk यांचा मास्टरस्ट्रोक! Starlink ला भारतात मंजुरी

Web Title: Fda suspends licences of 6 companies including zepto and irctc kitchen marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • FDA Action
  • IRCTC
  • Zepto

संबंधित बातम्या

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
1

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
2

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी
3

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स’
4

आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.