Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या दणक्यानंतर FDA मैदानात; साताऱ्यात लाखोंचा माल जप्त, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, भेसळखोरांविरुद्ध आंदोलनाचा इशारा

साताऱ्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत मनसेने केलेल्या पाठपुराव्यानंतर FDA ने तपासणी मोहीम राबवली. दोन ठिकाणांहून १ लाख ८७ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Oct 23, 2026 | 09:22 PM
FDA Logo

FDA Logo

Follow Us
Follow Us:
  • मनसेच्या निवेदनानंतर FDA ची तपासणी मोहीम
  • दोन ठिकाणांहून १.८७ लाखांचा माल जप्त
  • तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, तेल डेपोला दंड
 

सातारा, दि. २३ / प्रतिनिधी : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यानंतर साताऱ्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन ठिकाणांहून १ लाख ८७ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एका तेल डेपोस २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी १ ऑक्टोबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. १९ ऑक्टोबरच्या कारवाई अहवालानुसार, राजमाने तेल डेपोमधून १ लाख ६३ हजार रुपयांचा माल जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमधील साईबाबा कॅन्टीनचा परवानाही निलंबित झाला, तर होगार्ड मिल्कचा परवाना १२ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.

अहवालानंतर पुढील कारवाई होणार

पोवई नाका येथील लाटकर कंदी पेढा येथून २४ हजार १२० रुपयांचा खवा जप्त करण्यात आला. डी.के. तेल डेपोला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. दरम्यान, विविध हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधून खवा, हळद, तेल व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

दिवाळीपूर्वी महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; टपऱ्या-हातगाड्यांवर पालिकेचा धडाका, मुख्य बाजारपेठेकडील रस्ता मोकळा

दिवाळीतही धडक मोहीम राबवा

प्रशासनाच्या कारवाईनंतर मनसेने समाधान व्यक्त केले असले, तरी तपासणीपुरती मोहीम मर्यादित न ठेवता दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिवाळीत भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राहुल पवार यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता प्रशासनाने सातत्याने तपासणी करावी, अशी मनसेची भूमिका आहे.

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?

💡

Frequently Asked Questions

  • Que: साताऱ्यात FDA ने किती रुपयांचा माल जप्त केला?

    Ans: दोन ठिकाणांहून एकूण १ लाख ८७ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

  • Que: साताऱ्यात कोणत्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले?

    Ans: राजमाने तेल डेपो आणि साईबाबा कॅन्टीनचे परवाने निलंबित करण्यात आले, तर होगार्ड मिल्कचा परवाना १२ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.

  • Que: दिवाळीच्या काळात मनसेने काय इशारा दिला आहे?

    Ans: दिवाळीत भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे.

Web Title: Satara fda action food adulteration mns follow up seized goods vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • MNS
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?
1

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या बातमीचा दणका; स्मार्ट बाजारवर एफडीएची धडक!
2

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या बातमीचा दणका; स्मार्ट बाजारवर एफडीएची धडक!

Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!
3

Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित
4

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.