
Flight Cancellation Refund: उत्तर भारतात धुक्यामुळे फ्लाइट उशिरा? प्रवाशांसाठी सरकारचे नवे निर्देश
हेही वाचा: PhonePe launch daily SIP: तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणुक करत आहात? तर, सुरु करा 10 रुपयांच्या गुंतवणुकीपासून; जाणून घ्या एका क्लिकवर
हवाई वाहतूक ठप्प; ११८ उड्डाणे रद्द
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुक्याचे व्यापक परिणाम दिसून आले. मंगळवारी दृश्यमानता कमी असल्याने एकूण ११८ उड्डाणे रद्द करण्यात आली आणि १६ उड्डाणे वळवण्यात आली. याशिवाय, सुमारे १३० उड्डाणे उशिरा चालवली. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये ६० येणाऱ्या आणि ५८ जाणाऱ्या उड्डाणांचा समावेश होता. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की विमाने कमी दृश्यमानतेमध्ये (कॅट ३ मानक) उड्डाण करण्यास तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत, त्यांच्या ऑपरेशनमध्ये एकमेव अडथळा आहे.
एअर इंडियाने प्रवाशांच्या मदतीसाठी ‘फॉगकेअर’ नावाच्या उपक्रमाची माहिती दिली आहे. याअंतर्गत, जर धुक्यामुळे एखाद्या उड्डाणावर परिणाम होण्याची शक्यता असेल, तर प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आपल्या प्रवासाची तारीख बदलू शकतात किंवा कोणतीही कपात न करता पूर्ण पैसे परत घेऊ शकतात. कंपनीने म्हटले आहे की, त्यांचा ग्राऊंड स्फाट विमानतळांच्या मुख्य ठिकाणी प्रवाशांच्या मदतीसाठी तैनात आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही बाधित विमानतळांवर मदत पथके तैनात केली आहेत.
हेही वाचा: भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर
मंत्रालयाने जारी केलेल्या सूचना
जर विमान कंपनी तुम्हाला जेवण किंवा परतफेड देण्यास नकार देत असेल तर तुम्ही विमानतळावरील ‘नोडल ऑफिसर’कडे तक्रार करू शकता किंवा तुम्ही केंद्र सरकारच्या एअर सेवा पोर्टल किंवा पॉवर ऑनलाइनद्वारे तक्रार दाखल करू शकता.