भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लागले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘हिंदी-चिनी भाई भाई’, आता 5 वर्षांनी उघडले चिनी नागरिकांसाठी भारताचे ‘दरवाजे’; व्यापारालाही चालना
भारताच्या केंद्र सरकारने पुढील तीन वर्षांसाठी स्टील उत्पादनांवर 11 ते 12 टक्के शुल्काची घोषणा केली आहे. सुरुवातील हे शुल्क 12 टक्के असेल तर नंतर हे 5 टक्क्यांनी कमी होईल म्हणजे 11.5 पाच आणि नंतर 11 टक्के होईल असे केंद्र सरकराने म्हटले आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे स्टील उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारता हा कच्च्या स्टील उत्पादनात दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा देश मानला जातो. गेल्या काही काळात चीनकडून मोठ्या प्रमाणावर स्टील आयात करण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत स्टील उत्पादनांवर मोठा दबाव वाढला आहे. यामुळे स्टील उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन स्टेलनेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशन (DGTR) ने चीनच्या या आयातींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत अँटी-डंपिंग शुल्क लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.
या सर्व तपासणीनंतर DGTR ला आयातींमद्ये अचानक झालेल्या वाढीचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे देशातील स्टील उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हा धोका टाळण्यासाठी भारताने चीनकडून आयात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर शुल्क लागू केले आहे. याचे अधिकृत निवदनही जारी करण्यात आले आहे. याशिवाय भारताने चीनसह, व्हिएतनाम, नेपाळमधून होणाऱ्या आयातींवरही शुल्क लागू केले आहे. यातील काही उत्पादने वगळण्यात आली आहेत.
दरम्यान भारताने हा निर्णय घेण्यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक व्यापारातील तणावात होत असलेली वाढ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्टीन उत्पादनांवर लागलेल्या शुल्कामुळे जागतिक स्टील बाजारपेठांवर याचा परिणाम होत आहे. दक्षिण कोरिया, व्हिएतनामसारख्या देशांवरही अँटी-डंपिंग शुल्क लादण्यात आले आहे. यामुळे भारताचा हा निर्णय जागतिक बाजारपेठांच्या संतुलनासाठीचा एक भाग मानला जात आहे.
भारताने चीनला दिली धोबीपछाड! देशात अशी Electric Three Wheeler ची विक्री दुसरी कुठे झालीच नाही
Ans: भारताने चीनकडून आयात होणाऱ्या स्वस्त स्टील उत्पादनांवर 11 ks 12 टक्के शुल्क लादले आहे.
Ans: चीनमधून स्वस्त दराता मोठ्या प्रमाणात स्टील आयात केले जात आहे. यामुळे भारतीय स्टील उद्योगांना आर्थिक धोका निर्माण झाला आहे. हा आर्थिक धोका टाळण्यासाठी भारताने चीनवर शुल्क लादले आहे.
Ans: चीनवरील स्टील आयात शुल्क हे तीन वर्षांसाठी असून पहिल्या वर्षात हे 12 टक्के, नंतर पाट टक्क्यांनी कमी होऊ 11.5 आणि तिसऱ्या वर्षात 11 टक्के आसणार आहे.
Ans: चीनसह भारताने व्हिएतनाम आणि नेपाळच्या आयात शुल्कावर कर लादला आहे.






