Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Investment Planning: शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या

Investment Planning: शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चांगले म्युच्युअल फंड किंवा शेअर्स निवडणे पुरेसे नसते, तर बाजाराची दिशा बदलल्यास काय करायचे, याचेही नियोजन आवश्यक असते. फंड्सइंडियाचे ग्रुप सीईओ आकाश सप्रू यांनी गुंतवणूकदारांसाठी AA-BB-CC ही सहा अंकांची रणनीती स्पष्ट केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2026 | 02:15 PM
शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या

शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या

Follow Us
Follow Us:
  • केवळ पोर्टफोलिओ तयार करून उपयोग नाही!
  • बाजारात तेजी किंवा घसरण झाल्यास काय करायचे
  • आकाश सप्रू यांचा गुंतवणूकदारांना सल्ला
Investment Planning: शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदार चांगले शेअर्स, म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचे पर्याय निवडण्यावर भर देतात. मात्र, बाजाराची दिशा बदलल्यास काय करायचे, याचे नियोजन अनेकदा केले जात नाही. बाजारात तेजी असताना गुंतवणूक करणे सोपे वाटते. परंतु अचानक बाजारात घसरण झाली किंवा शेअर्सचे मूल्यांकन खूप वाढले, तर गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत केवळ पोर्टफोलिओ असणे पुरेसे नसून त्यामागे ठोस रणनीती असणे आवश्यक आहे. फंड्सइंडियाचे ग्रुप सीईओ आकाश सप्रू यांनी गुंतवणूकदारांसाठी AA-BB-CC ही सहा अंकांची विशेष रणनीती स्पष्ट केली आहे. (Investment Planning)

काय आहे AA-BB-CC रणनीती?

प्रत्येक गुंतवणूकदाराकडे स्वतःचा पोर्टफोलिओ असतो. मात्र, त्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या प्रकारची गुंतवणूक आहे, यापलीकडे जाऊन बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये काय करायचे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. यासाठी AA-BB-CC ही सहा अंकांची चौकट उपयोगी ठरू शकते. हा कोणताही अकाउंट नंबर नसून गुंतवणुकीच्या धोरणाचा क्रमांक आहे. या रणनीतीत तीन महत्त्वाचे भाग आहेत.

Gold Jewellery Exports: भारतीय रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत मोठी झेप! ऑक्टोबरमध्ये ३४ टक्क्यांची वाढ; आयातीतही ८५.८५ टक्के वाढ

AA – Asset Allocation: गुंतवणूक कुठे आणि किती करायची?
BB – Bubble Plan: बाजारात अतिउत्साह आणि अवाजवी मूल्यांकन निर्माण झाल्यास काय करायचे?
CC – Crisis Plan: बाजारात मोठी घसरण झाल्यास कोणती पावले उचलायची?

 AA म्हणजे ॲसेट ॲलोकेशन; गुंतवणुकीचे योग्य प्रमाण ठरवा

AA म्हणजे ॲसेट ॲलोकेशन अर्थात मालमत्ता वाटप. हा गुंतवणुकीतील सर्वांत महत्त्वाचा निर्णय मानला जातो. कारण कोणता म्युच्युअल फंड निवडायचा किंवा कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची, याआधी इक्विटी आणि डेटमध्ये किती पैसे गुंतवायचे, हे ठरवणे आवश्यक असते. ॲसेट ॲलोकेशन ठरवताना तीन महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो.

Time (कालावधी): गुंतवणूकदाराला आपले पैसे किती काळ गुंतवून ठेवता येतील?

Tolerance (जोखीम सहन करण्याची क्षमता): गुंतवणुकीच्या मूल्यात तात्पुरती घट झाल्यास ती स्वीकारण्याची तयारी किती आहे?
– Trade-off (तडजोड): भविष्यात अधिक परतावा मिळण्याच्या शक्यतेसाठी अल्पकाळातील किती चढ-उतार स्वीकारता येतील?
एकदा गुंतवणुकीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर त्याचा वेळोवेळी आढावा घेणेही आवश्यक आहे. बाजारात मोठी तेजी आल्यास पोर्टफोलिओमधील इक्विटीचे प्रमाण वाढू शकते. तर बाजार घसरल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते. अशा वेळी पोर्टफोलिओचे रिबॅलन्सिंग करून गुंतवणुकीतील जोखीम पुन्हा नियोजित पातळीवर आणता येते.

BB म्हणजे बबल प्लॅन; बाजारातील अतिउत्साह ओळखा

शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो. शेअर्सच्या किमती वाढत असल्याने अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा मोह निर्माण होतो. मात्र, बाजारातील मूल्यांकन खूप वाढल्यास आणि आशावादाचे रूप अतिउत्साहात बदलल्यास जोखीम वाढू शकते. अशा परिस्थितीत BB म्हणजेच बबल प्लॅन महत्त्वाचा ठरतो. बाजार नेमका कोणत्या पातळीवर सर्वोच्च स्थितीत पोहोचेल, याचा अंदाज बांधण्याऐवजी बाजारात अतिउत्साह निर्माण झाल्यास काय करायचे, हे आधीच ठरवणे आवश्यक आहे.

यासाठी तीन महत्त्वाचे संकेत तपासता येतात.

1. कंपन्यांचे उत्पन्न: कंपन्यांच्या नफ्यात आणि उत्पन्नात किती वाढ होत आहे?
2. बाजारातील मूल्यांकन: शेअर्सच्या किमती कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीच्या तुलनेत किती वाढल्या आहेत?
3. गुंतवणूकदारांची भावना: बाजारात सामान्य आशावाद आहे की अतिउत्साह निर्माण झाला आहे?
या संकेतांमधून जोखीम वाढत असल्याचे दिसल्यास पोर्टफोलिओमधील काही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने दुसरीकडे वळवता येते. संपूर्ण गुंतवणूक विकणे किंवा सर्व पैसे बाजारातून काढणे, असे टोकाचे निर्णय घेण्याची गरज नाही. बाजारातील परिस्थितीनुसार आधीच निश्चित केलेल्या पद्धतीने निर्णय घेणे हा बबल प्लॅनचा मुख्य उद्देश आहे.

3. CC म्हणजे क्रायसिस प्लॅन; बाजार कोसळल्यास काय कराल?

बाजारात तेजी असताना अधिक परताव्याची अपेक्षा निर्माण होते. मात्र, बाजारात मोठी घसरण झाली की अनेक गुंतवणूकदार घाबरतात. काही जण एसआयपी बंद करतात, तर काही जण चांगल्या गुंतवणुकीही विकून पैसे कॅशमध्ये ठेवतात. अशा वेळी CC म्हणजे क्रायसिस प्लॅन उपयोगी ठरतो. बाजारात घसरण होण्यापूर्वीच कोणत्या परिस्थितीत किती गुंतवणूक करायची, हे ठरवून ठेवणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, बाजारात सुमारे २० टक्क्यांची घसरण झाल्यास डेटमधील गुंतवणुकीपैकी २० टक्के रक्कम इक्विटीमध्ये वळवण्याचे नियोजन करता येते. बाजार आणखी घसरल्यास टप्प्याटप्प्याने इक्विटीमधील गुंतवणूक वाढवण्याचा विचार करता येतो. मात्र, गुंतवणुकीचे नेमके प्रमाण आणि बाजारातील घसरणीची पातळी ही प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि ॲसेट ॲलोकेशन यांनुसार ठरवणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीचे निर्णय ऑटोमेट करण्याचाही पर्याय

बाजारातील चढ-उतारांमध्ये भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी आधीच निश्चित केलेली रणनीती उपयोगी ठरू शकते. बाजार ठरावीक पातळीवर पोहोचल्यानंतर काही गुंतवणुकीच्या कृती ऑटोमेट करण्याचाही पर्याय उपलब्ध असू शकतो. उदाहरणार्थ, बाजारात ठरावीक प्रमाणात घसरण झाल्यानंतर डेटमधील काही रक्कम इक्विटीमध्ये वळवण्याची व्यवस्था करता येते. त्यानंतर बाजारात सुधारणा होत गेल्यास पोर्टफोलिओ पुन्हा नियोजित ॲसेट ॲलोकेशनच्या दिशेने आणता येतो.

पोर्टफोलिओसोबत रणनीती असणेही तितकेच महत्त्वाचे

गुंतवणूक करताना कोणते फंड किंवा शेअर्स खरेदी करायचे, यावर अनेक गुंतवणूकदार भर देतात. मात्र, बाजारात अतिउत्साह निर्माण झाल्यास किंवा मोठी घसरण झाल्यास काय करायचे, याचे नियोजन तुलनेने कमी केले जाते. आकाश सप्रू यांच्या मते, पोर्टफोलिओ म्हणजे केवळ विविध फंडांचा संग्रह नसावा. त्यासोबत बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कोणती पावले उचलायची, याची निश्चित योजना असणे आवश्यक आहे.

Sahara Refunds: मोठी अपडेट! बँक खात्यात 7 दिवसात पाठविण्यात आले तब्बल 22,10,00,000 रुपये

AA-BB-CC ही रणनीती गुंतवणूकदारांना तीन महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यास मदत करते. सामान्य परिस्थितीत कुठे गुंतवणूक करायची, बाजारात अतिउत्साह निर्माण झाल्यास जोखीम कशी नियंत्रित करायची आणि बाजारात मोठी घसरण झाल्यास पुढील गुंतवणूक कशी करायची, याचे नियोजन यातून करता येते.

थोडक्यात सांगायचे तर, बाजारात पुढे काय होणार आहे, याचा अचूक अंदाज बांधणे शक्य नाही. मात्र, बाजाराची दिशा बदलल्यानंतर आपण काय करणार आहोत, याची तयारी आधीच करता येते. हाच AA-BB-CC रणनीतीचा आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: FundsIndia, Aakash Sapru, Portfolio Management Strategy, AA BB CC Strategy, Investment Planning, Asset Allocation, Bubble Plan, Crisis Plan, Stock Market Investment, Market Volatility, Mutual Fund Investment, Portfolio Rebalancing, Equity Investment, Investment Risk Management, business news marathi, business news, व्यवसाय बातम्या, business latest news, business news in marathi, business live updates, व्यवसाय, business live news, Indian business news, व्यवसाय ताज्या मराठी बातम्या, व्यवसाय ताज्या बातम्या, business updates,

    Ans: AA-BB-CC ही गुंतवणुकीसाठी सहा अंकांची रणनीती आहे. AA म्हणजे ॲसेट ॲलोकेशन, BB म्हणजे बबल प्लॅन आणि CC म्हणजे क्रायसिस प्लॅन.

  • Que: बाजारात मोठी तेजी आल्यास गुंतवणूकदारांनी काय करावे?

    Ans: बाजारातील मूल्यांकन खूप वाढल्यास आणि अतिउत्साहाचे वातावरण निर्माण झाल्यास गुंतवणूकदारांनी कंपन्यांचे उत्पन्न, बाजाराचे मूल्यांकन आणि गुंतवणूकदारांची भावना या संकेतांचा विचार करावा.

  • Que: शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यास क्रायसिस प्लॅन कसा उपयोगी ठरतो?

    Ans: बाजारात घसरण झाल्यास डेटमधील गुंतवणुकीचा काही भाग इक्विटीमध्ये वळवण्याचे नियोजन आधीच करता येते. बाजार आणखी घसरल्यास टप्प्याटप्प्याने गुंतवणूक वाढवण्याची रणनीती आखता येते.

Web Title: Fundsindia aakash sapru portfolio strategy aa bb cc market crash bubble plan sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Gold Jewellery Exports: भारतीय रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत मोठी झेप! ऑक्टोबरमध्ये ३४ टक्क्यांची वाढ; आयातीतही ८५.८५ टक्के वाढ
1

Gold Jewellery Exports: भारतीय रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत मोठी झेप! ऑक्टोबरमध्ये ३४ टक्क्यांची वाढ; आयातीतही ८५.८५ टक्के वाढ

Sahara Refunds: मोठी अपडेट! बँक खात्यात 7 दिवसात पाठविण्यात आले तब्बल 22,10,00,000 रुपये
2

Sahara Refunds: मोठी अपडेट! बँक खात्यात 7 दिवसात पाठविण्यात आले तब्बल 22,10,00,000 रुपये

Mukesh Ambani: पृथ्वी कमी पडली आता अंतराळावर कब्जा करण्याच्या तयारीत अंबानी! 1600 सॅटेलाईटचा मोठा खेळ
3

Mukesh Ambani: पृथ्वी कमी पडली आता अंतराळावर कब्जा करण्याच्या तयारीत अंबानी! 1600 सॅटेलाईटचा मोठा खेळ

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात आज घसरणीचे संकेत, या स्टॉक्सवर तज्ज्ञांची नजर
4

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात आज घसरणीचे संकेत, या स्टॉक्सवर तज्ज्ञांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.