
Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात आज घसरणीचे संकेत, या स्टॉक्सवर तज्ज्ञांची नजर
मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मंगळवारी, सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला आणि निफ्टी २५,३८० च्या पातळीवर बंद झाला. ३०-शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स ४२७.४० अंकांनी, म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी वधारून ८२,५३२.१९ अंकांवर स्थिरावला. सत्रादरम्यान, या निर्देशांकाने ७९२.७ अंकांची, म्हणजेच ०.९६ टक्क्यांची मोठी उसळी घेत ८२,८९७.४९ अंकांचा दिवसांतर्गत उच्चांक गाठला होता. एनएसई निफ्टी ५० ९६.३० अंकांनी, म्हणजेच ०.३८ टक्क्यांनी वधारून २५,३८७.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य: Pinterest)
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्हज व क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे प्रमुख, जय ठक्कर यांनी आज गुंतवणूकदारांना तीन शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि ह्युंदाई मोटर इंडिया यांचा समावेश आहे. तसेच तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना लार्ज-कॅप आयटी स्टॉक्स, विशेषतः टीसीएस आणि इन्फोसिसकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे, कारण त्यांची अमेरिकन आणि युरोपियन बाजारपेठांमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
बाजारातील इतर तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना बँक ऑफ बडोदा लि., प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लि., कर्नाटक बँक लि., बिर्ला केबल लि., नेस्ले इंडिया लि. हे स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.