Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी

Gautam Adani Masterstroke : उद्योगपती गौतम अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. Adani Power मध्ये त्यांच्या १० उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या योजनेला NCLT कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 26, 2026 | 04:13 PM
Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण ( सौजन्य - सोशल मीडिया )

Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक!
  • Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण
  • NCLT कडून अंतिम मंजुरी
Gautam Adani Masterstroke : देशातीलच नाही तर जगच्या लिस्टमधील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठा डंका वाजवला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणा म्हणजेच NCLT च्या मुंबई खंडपीठाने दिलेल्या अनुकूल निर्णयानंतर, अदानी पॉवर लिमिटेडला तिच्या विलीनीकरण योजनेसाठी सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता Adani Power मध्ये 10 कंपन्यांचं विलीनीकरण होणार आहे. याचा नेमका काय परिणाम होणार आहे? ( Gautam Adani Masterstroke ) 

अरे वाहह… Tax चं झंझटही होणार कमी, NRI कडून घर किंवा जमीन खरेदी करणे होणार सोपं! 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम

न्यायाधिकरणाच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार, विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड VIPL चे अदानी पॉवरमध्ये विलीनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रमुख ऊर्जा कंपनीची कॉर्पोरेट रचना सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

कोणत्या १० कंपन्या या लिस्टमध्ये?

हा निर्णय NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. ज्यामध्ये इतर नऊ पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांच्या विलीनीकरणास मंजुरी देण्यात आली होती. या कंपन्यांमध्ये अदानी पॉवर दहेज लिमिटेड, कच्छ पॉवर जनरेशन लिमिटेड, रिसर्जंट फ्युएल मॅनेजमेंट लिमिटेड, महान फ्युएल मॅनेजमेंट लिमिटेड, ओडिशा थर्मल एनर्जी लिमिटेड, कोरबा पॉवर लिमिटेड, अनुपपूर थर्मल एनर्जी MP प्रायव्हेट लिमिटेड, मिर्झापूर थर्मल एनर्जी UP प्रायव्हेट लिमिटेड आणि एम्बेरिझा इन्फ्रा पार्क लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल

या कंसोलिडेशन स्कीमची तारीख १ एप्रिल, २०२५ आहे. अदानी पॉवरने म्हटले आहे की, इतर सर्व प्रक्रियात्मक टप्पे पूर्ण झाल्यावर ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि त्यावेळी स्टॉक एक्सचेंजना सूचित केले जाईल. या धोरणात्मक एकीकरणाचा उद्देश कार्यान्वयन व्याप्ती वाढवणे, नियंत्रण संरचना सुधारणे आणि कायदेशीर व अनुपालन खर्च कमी करणे हा आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथे ६०० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प चालवणाऱ्या VIPL ला, APL च्या विद्यमान १४,५५० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक आणि सौर ऊर्जा प्रकल्पांच्या जाळ्यासोबत एकत्रित करून, कंपनी आपला एकत्रित मालमत्ता आधार आणि कार्यान्वयन क्षमता वाढवण्याच्या नियोजनात आहे.

अदानी पॉवरच्या शेअर्सनी ५ वर्षांत किती रिटर्न?

अदानी पॉवरचे बाजार भांडवल ₹३,९१,४७९ कोटी आहे. अदानी पॉवरच्या शेअरची किंमत ₹२०३ आहे. अदानी पॉवरने १ वर्षात ३३.८८% रिटर्न दिला आहे. ३ वर्षांत ३८.२५% परतावा दिला आहे. ५ वर्षांतील त्याचा परतावा ५९.७६% आहे.

( Desclaimer : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Web Title: Gautam adani masterstroke nclt approves merger of 10 companies into adani power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Adani Group
  • Gautam Adani
  • Investments

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.