NRI कडून घर, जमीन खरेदी करणे होणार सोपे ( सौजन्य - सोशल मीडिया )
पहिली गोष्ट म्हणजे यामुळे महत्त्वाचा हा फायदा होणार आहे तो म्हणजे खरेदीदारांसाठी TDS जमा करण्याची आणि त्याची नोंद करण्याची प्रक्रिया बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सोपी होणार आहे.
हा नवा नियम मुख्य म्हणजे रहिवाशी व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी ही अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करण्यात आला आहे. अनिवाशी भारतीयांकडून मालमत्ता खरेदी करणाऱ्या रहिवासी व्यक्ति किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांना आता TDS साठी स्वतंत्र TAN मिळवण्याची गरज लागणार नाही. त्याऐवजी त्यांच्या पॅनच्या आधारे चलन- सह-स्टेटमेंटद्वारे TDS ची नोंद केली जाऊ शकणार आहे. पण यामधील अपवाद म्हणज कर कपातीचं बंधन पूर्णपणे रद्द होणार नाही.
निवासी व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (HUFs) यापुढे स्वतंत्र टॅन (TAN) मिळवण्याची आवश्यकता राहणार नाही.
TDS जमा करण्यासाठी आणि त्याची नोंद करण्यासाठी पॅन-आधारित चलन-सह-स्टेटमेंटचा वापर केला जाईल.
फॉर्म १४१ मध्ये मालमत्तेशी संबंधित एक नवीन अनुसूची ‘ई’ (Schedule E) जोडण्यात आली आहे.
या अनुसूचीमध्ये मालमत्ता, खरेदी आणि अनिवासी भारतीय म्हणजेच NRI विक्रेत्याशी संबंधित माहिती देणे आवश्यक असेल.
नवीन नियमांनुसार, खरेदीदारांना मालमत्ता आणि खरेदी-विक्रीशी संबंधित अनेक महत्त्वाचे तपशील देणे आवश्यक असणार आहे. या माहितीत NRI विक्रेत्याचा PAN, पत्ता, करार आणि नोंदणी माहितीचा समावेश असू शकतो. फॉर्म १४१ मध्ये स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी एक स्वतंत्र नोंदणी यंत्रणा देखील समाविष्ट आहे.
मागील हप्त्यात किती रक्कम भरली होती?
चालू हप्त्यात किती रक्कम भरली होती?
हा पहिला, मधला की शेवटचा हप्ता आहे?
पेमेंटची तारीख काय आहे?
कोणत्या रकमेवर टीडीएस कापला गेला?
टीडीएसचा दर आणि कापलेली रक्कम?
नियमांमधील बदलाचा अर्थ असा नाही की अनिवासी भारतीयांकडून मालमत्ता खरेदीवर टीडीएस भरण्याची जबाबदारी संपली आहे. नवीन नियम निश्चितपणे टीडीएस प्रक्रिया सोपी करतील, परंतु ते खरेदीदाराची जबाबदारी काढून टाकणार नाहीत. त्यामुळे, अनिवासी भारतीयाकडून मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, त्याचा पॅन, परदेशातील पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आणि आवश्यक असल्यास, टीआरसी किंवा टिन यांसारखी माहिती तयार ठेवणे आवश्यक असेल.






