Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले; वाचा… गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

गौतम अदानी यांनी १९७० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र, या कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला होता. विशेष म्हणजे यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण थांबवत ते बिझनेसकडे वळाले. आज त्यांचे नाव जागतिक पातळीवर सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर तर भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 06, 2024 | 02:52 PM
ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले, वाचा... गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले, वाचा... गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही अनेक आदर्श व्यक्ती किंवा उद्योगपतींच्या यशोगाथा एेकल्या असतील, वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हांला भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या आयुष्यातील रंजक कहाणीबाबत सांगणार आहोत. विशेष म्हणजे त्यांची ही कहाणी विद्यार्थी दशेतील असून, त्यांना शाळेत प्रवेश न मिळण्याबाबतची आहे. गौतम अदानी यांनी १९७० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र, या कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला होता. विशेष म्हणजे यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण थांबवत ते बिझनेसकडे वळाले. आज त्यांचे नाव जागतिक पातळीवर सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर तर भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विक्रम नानकानी यांनी दिला आठवणींना उजाळा

५ सप्टेंबर २०२४ रोजी देशभरातील शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच शिक्षक दिनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना प्रवेश नाकारणाऱ्या याच कॉलेजने विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यापुर्वी विद्यार्थ्यांच्या संघाचे अध्यक्ष विक्रम नानकानी यांनी हा रंजक किस्सा सांगितला. नानकानी यांनी सांगितले की, 1977-1978 मध्ये गौतम अदानी हे १६ वर्षाचे असताना, त्यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, या दुर्देवाने जय हिंद कॉलेजने त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारला होता. विशेष म्हणजे गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद हे त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.

हे देखील वाचा – डालबर्ग अहवाल: पूर्णत: सक्रिय भारतीय 2047 पर्यंत, देशाची GDP वार्षिक 15 ट्रिलियन रूपयांपर्यंत नेतील

काही काळ हिरे व्यवसायात केले काम

यावेळी नानकानी यांनी म्हटले आहे की, गौतम अदानी हे जय हिंद कॉलेजचे माजी विद्यार्थी राहिले आहेत. मात्र, दुर्देवाने कॉलेजने त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात पुर्ण क्षमतेने झोकून देत काम करणे सुरु केले. त्यांनी पुढील दोन वर्ष मुंबईत हिरा निर्मिती व्यवसायात काम केले. त्यानंतर ते काही काळ गुजरातला गेले. तिथूनच त्यांच्या व्यावसायिक यशाचा आलेख उंचावत गेला. असेही त्यांनी म्हटले आहे.

१९९८ पासून विस्तारला हळूहळू व्यवसाय

गौतम अदानी यांनी १९९८ मध्ये वस्तूंचा व्यापार करणारी एक कंपनी स्थापन केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी हळूहळू बंदरे, खाणी, बांधकाम, वीज, शहरी गॅस, नवीकरणीय उर्जा, सिंमेट उद्योगामध्ये आपले स्थान निर्माण केले. आज गौतम अदानी यांचे नाव जागतिक पटलावर झळकत आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार शेजारील देशांसह आशियाभरात पसरला आहे.

मी तेव्हाच पहिली सीमा ओलांडली होती

‘ब्रेकिंग बाउंड्रीज: द पॉवर ऑफ पॅशन अँड अनकन्वेंशनल पाथ्स टू सक्सेस’ या विषयावर बोलताना गौतम अदानी म्हणाले की, ते 16 वर्षांचे असताना त्यांनी पहिली सीमा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अभ्यास सोडून व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यावेळी गौतम अदानी यांनी सांगितले आहे की, मला बरेच लोक विचारतात, “तू मुंबईला गेला होतास?” तू तुझे शिक्षण का पूर्ण केले नाहीस?’ त्यावर आपले उत्तर हेच असते की, या शहरात काहीतरी करण्याची हिंमत आहे. व्यवसायासाठी मुंबई हे माझे प्रशिक्षण ठिकाण होते. इथे मी व्यवसाय शिकलो. मुंबईनेच मला मोठा विचार करायला शिकवले. तुमच्या मर्यादेपलीकडे स्वप्न पाहण्याचे धैर्य तुमच्यात असले पाहिजे. हे मला मुंबईने शिकवले, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Gautam adani was rejected by mumbais jai hind college years later he was invited by the same college to deliver a lecture on teachers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Gautam Adani
  • Mumbai

संबंधित बातम्या

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर
1

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना
2

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 महिने राहणार बंद, कोणत्या ट्रेनवर परिणाम?
3

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 महिने राहणार बंद, कोणत्या ट्रेनवर परिणाम?

विमानाच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाने ओढली सिगारेट, पोलिसांनी घेतले ताब्यात
4

विमानाच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाने ओढली सिगारेट, पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.