Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway : ‘…म्हणून लोकल उशीराने धावते’, दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

Central Railway News Marathi : दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने आले असून मध्य रेल्वेकडून राज्याच्या मुख्य सचिवांना थेट पत्र देणय्यात आले असून या पत्रात काम करण्याच्या सूचना दिल्या आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 21, 2026 | 12:36 PM
'...म्हणून लोकल उशीराने धावते', दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

'...म्हणून लोकल उशीराने धावते', दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

Follow Us
Follow Us:
  • दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने
  • दररोज ३९ वेळा बंद होणाऱ्या फाटकामुळे लोकल सेवेला गंभीर फटका
  • रेल्वे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अखेर उघडपणे समोर
Mumbai Local News Marathi: सात वर्षांपासून अर्धवट पडून असलेल्या दिवा उड्डाणपूल प्रकरणी रेल्वे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अखेर उघडपणे समोर आला आहे. मध्य रेल्वेने थेट राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत उड्डाणपूलाचे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. दररोज ३९ वेळा बंद होणाऱ्या फाटकामुळे लोकल सेवेला गंभीर फटका बसत असल्याचे रेल्वेने स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे.

दिवा जंक्शनवरील फाटकामुळे दररोज तब्बल ६० ते ७० लोकल गाड्या प्रभावित होत आहेत. प्रत्येक वेळी फाटक बंद झाले की, गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. सिग्नलिंगची साखळी विस्कळीत होते. संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वेळ भरून काढण्यासाठी रेल्वेला अक्षरशः कसरत करावेत लागते. रेल्वेच्या अंतर्गत अंदाजानुसार, हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास वक्तशीरपणात किमान ३ ते ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच आज जो विलंब रोजचा नियम बनला आहे, तो मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो असे रेल्वेचे म्हणणे आहे.

केईएममध्ये ‘एमएए आयव्हीएफ’ केंद्र स्थापन! परवडणाऱ्या वंध्यत्व उपचारांना चालना देण्याचा केंद्राचा उद्देश

सात वर्षे उलटूनही पूल आजही अर्धवट अवस्थेत

दिवा स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक अत्यंत महत्त्वाचं जंक्शन आहे. येथून दररोज लाखो प्रवासी कळवा, मुंब्रा, शीळफाटाकडे प्रवास करतात. २०१७ साली या ठिकाणी पूर्व-पश्चिम जोडणारा रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्याचं काम मोठ्या गाजावाजा करत सुरू झाल.

प्रारंभी जलदगतीने सुरू झालेलं हे काम काही महिन्यांतच थांबलं आणि त्यानंतर सात वर्षांचा काळ उलटून गेला तरी पूल आजही अर्धवट अवस्थेत उभा आहे.

पूर्वेकडील बाजूस काही खांब उभे राहिले, पण पश्चिमेकडील बाजूला अजूनही भूसंपादन न झाल्यामुळे काम सुरूच होऊ शकलेलं नाही.

फाटकाचा दररोजचा बनतोय अडथळा

सध्या फाटक बंद झाले की वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पसरतात. रुग्णवाहिका अडकतात. कामगार उशिरा पोहोचतात. रेल्वेगाड्या थांबतात किंवा रेंगाळतात. हा प्रश्न केवळ स्थानिकांचा राहिला नसून, तो संपूर्ण उपनगरीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर घाला घालतो आहे. उड्डाणपूल पूर्ण होणे ही आता केवळ मागणी नाही, तर तातडीची गरज बनला आहे.

दिवा स्थानकात रोज फाटक ३९ वेळा बंद

दिवा स्थानक हे उपनगरीय जाळ्यातील अत्यंत गर्दीचे केंद्र मानले जाते. येथे दररोज सुमारे ८९४ लोकल गाड्या धावतात. त्यापैकी ७० ते ७५ टक्के गाड्या येथे थांबतात. स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून सरासरी ३९ वेळा बंद होते. प्रत्येक वेळी वाहतूक ठप्प होते आणि रेल्वेचे वेळापत्रक ढासळते. राज्य सरकार या पत्राची किती दखल घेते आणि प्रत्यक्ष कामाला किती वेग देते, यावरच दिवा परिसरातील लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास अवलंबून आहे.

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

Web Title: Direct letter from central railway to the state chief secretaries instructions given for work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
1

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Mumbai Lake Level: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सात तलावांमधील पाणीसाठा ४८ टक्क्यांच्या पार; ‘तुळशी’, ‘विहार’ तलाव ओव्हरफ्लो…
2

Mumbai Lake Level: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सात तलावांमधील पाणीसाठा ४८ टक्क्यांच्या पार; ‘तुळशी’, ‘विहार’ तलाव ओव्हरफ्लो…

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स
3

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
4

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.