Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

मुंबई मेट्रो लाईन २ बी ने कुर्ल्यातील हलव पुलावर दोन यू-गर्डर यशस्वीरित्या सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विमानतळ फनेल झोनमध्ये उंचीच्या मर्यादा असतानाही एमएमआरडीए टीमने हे आव्हानात्मक काम पूर्ण केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 21, 2026 | 06:28 PM
मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला दरम्यानचा वाहतूक कोंडीतून होणार सुटका

मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला दरम्यानचा वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून मुंबई मेट्रो लाईन २बी (डी. एन. नगर – मंडाले) अंतर्गत कुर्ला येथील हलाव पूलावर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजता दोन यू-गर्डरचे यशस्वी लाँचिंग पूर्ण करण्यात आले. या कामगिरी मुळे मुंबई अधिक वेगवान व परस्पर-संलग्न घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

मेट्रो लाईन २बी हा महत्त्वाचा पूर्व–पश्चिम कॉरिडोर असून, डी. एन. नगर, बीकेसी, कुर्ला, चेंबूर व मंडाले या प्रमुख निवासी व व्यापारी केंद्रांना जोडणारा मार्ग आहे. या तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या कामाची यशस्वी पूर्तता ही दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी विश्वासार्ह व कार्यक्षम सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रगती दर्शविते.

मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

हलाव पूल परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने मेट्रो व्हायाडक्ट व विद्यमान पूल यांच्यामधील उभ्या अंतराची मर्यादा केवळ ३.५ मीटर आहे. या तांत्रिक मर्यादांचा विचार करून संबंधित यंत्रणांची आवश्यक मंजुरी प्राप्त केल्यानंतर काम अत्यंत अचूक नियोजनाद्वारे सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले.

सार्वजनिक सोयीचा विचार करून ही उभारणी प्रक्रिया वाहतूकदृष्ट्या व्यस्त असलेल्या या परिसर असल्याने रात्रीच्या वेळी पार पाडण्यात आली. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले, सुरक्षितता सुनिश्चित झाली व जड यंत्रसामग्रीचे कार्यक्षम नियोजन शक्य झाले. हलाव पूलावरून हलकी वाहने जसे की रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व रुग्णवाहिका यांची वाहतूक सुरू असून, जड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

हलाव पूलासमोरील एस. जी. बर्वे मार्ग मेट्रो स्थानक विमानवाहतूक उंची निकषांनुसार एकस्तरीय स्वरूपात नियोजित करण्यात आले आहे. स्थानकाच्या पायाभूत व पिअर कामांसह हलाव पूलाच्या दोन्ही बाजूंवरील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले असून, यामुळे समन्वयित व वेळेवर अंमलबजावणी झाल्याचे दिसून येते.

प्रत्येकी २० मीटर लांबीचे दोन यू-गर्डर (P610–P611 LHS) हे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली उभारण्यात आले. या टप्प्यानंतर प्रकल्प ट्रॅक बसविणे, ओव्हरहेड कॅटेनरी प्रणाली, वीजपुरवठा व्यवस्था व दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणी अशा पुढील कामांकडे प्रगती करीत आहे. तत्परतेने परिसर विकास उपक्रमही राबविण्यात येत आहेत. ए. एच. वाडिया रोडच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव बृहमुंबई महानगर पालिका यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असून, यामुळे वाहतूक सुलभ होण्यास तसेच गणेश विसर्जन व इतर गर्दीच्या कालावधीत वाहतुकीचे सुकर नियमन होण्यास मदत होईल. बाधित संरचनांचे पुनर्वसन नियोजित व न्याय्य पद्धतीने करण्यात येत असून, सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.

हलाव पूलावरील यू-गर्डर उभारणी ही सूक्ष्म नियोजन, तांत्रिक कौशल्य व सार्वजनिक हिताचा समतोल राखण्याचे द्योतक आहे. प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यासह मेट्रो लाईन २ बी ही मुंबईकरांसाठी विश्वासार्ह व कार्यक्षम वाहतूक व यास हातभार लावणार आहे.

SE Reservation: तेलंगणाने करून दाखवले, महाराष्ट्र का पिछाडीवर? SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अमित गोरखे आक्रमक

Web Title: Mmrda mumbai metro line 2b halav bridge kurla u girders launched latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • MMRDA
  • Mumbai
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

मुंबई – नवी मुंबई विमानतळांना जोडणार Metro,  सिडकोच्या अर्थसंकल्पात मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांना चालना
1

मुंबई – नवी मुंबई विमानतळांना जोडणार Metro, सिडकोच्या अर्थसंकल्पात मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांना चालना

Mankhurd News: मानखुर्दमध्ये मोठी कारवाई! 1200 अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा; मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश
2

Mankhurd News: मानखुर्दमध्ये मोठी कारवाई! 1200 अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा; मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

Mumbai: मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता! वसईतील ‘त्या’ चिमुकल्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत मंजूर
3

Mumbai: मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता! वसईतील ‘त्या’ चिमुकल्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत मंजूर

KEM Hospital: २५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ… मृत्यूवर मात करून ‘इवला योद्धा’ जिंकला!
4

KEM Hospital: २५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ… मृत्यूवर मात करून ‘इवला योद्धा’ जिंकला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.