Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी..! 20 किमीपर्यंत टोलमाफी, ‘या’ गाड्यांना मिळणार सुविधा; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) बसवलेल्या खासगी वाहनांसाठी महामार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 20 किलोमीटरचा हा मोफत प्रवास केवळ महामार्गांवरच नाही तर एक्स्प्रेस वेवरही लागू असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 10, 2024 | 05:51 PM
आनंदाची बातमी..! 20 किमीपर्यंत टोलमाफी, 'या' गाड्यांना मिळणार सुविधा; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

आनंदाची बातमी..! 20 किमीपर्यंत टोलमाफी, 'या' गाड्यांना मिळणार सुविधा; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

Follow Us
Close
Follow Us:

आपल्यापैकी अनेकजण दैनंदिन राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असतात. आता अशाच प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) बसवलेल्या खासगी वाहनांसाठी महामार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 किलोमीटरचा हा मोफत प्रवास केवळ महामार्गांवरच नाही तर एक्स्प्रेस वेवरही लागू असणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत

मंगळवारी (ता.१०) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये या मोफत प्रवासाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसार महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. तथापि, 20 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी, वाहनधारकांना एकूण अंतरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

हे देखील वाचा – इलेक्ट्रिक वाहनांबाबत नितीन गडकरींचे मोठे विधान; चीनला देणार धोबीपछाड!

उपग्रह आधारित टोल संकलन प्रणाली

दरम्यान, अलिकडेच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून फास्टॅगसह अतिरिक्त सुविधा म्हणून प्रायोगिक तत्त्वावर निवडक राष्ट्रीय महामार्ग उपग्रह आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कर्नाटकातील एनएच-275 च्या बेंगळुरू-म्हैसूर सेक्शन आणि हरियाणातील एनएच-709 च्या पानिपत-हिसार सेक्शनवर हा प्रायोगिक प्रयोग राबवला जाणार आहे.

हे देखील वाचा – एक रुपयाही भांडवल न गुंतवता सुरु करा हा व्यवसाय; …कमाईची पुर्ण गॅरंटी!

जीएनएसएस प्रणाली सुरु

राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवर चालणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जातो. त्यासाठी महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी टोल आकारणी केली जाते. यामध्ये यापुर्वी रोख रक्कम आकारली जात होती. त्यानंतर फास्टॅगची सुविधा सुरु करण्यात आली. तर आता जीएनएसएस ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. ही उपग्रह आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे. आता हायवे किंवा एक्स्प्रेस वेवर कोणतेही वाहन प्रवास करताना अंतरानुसार खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. भारताची स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम गगन आणि NavIC यांच्या मदतीने वाहनांचा माग काढणे सोपे होणार आहे. यासोबतच यूजरचा डेटाही सुरक्षित असणार आहे.

Web Title: Gnss vehicle exemption of toll up to 20 km these trains will get facilities notification issued by the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 05:43 PM

Topics:  

  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video
1

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.