Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Benefits Gold Loans: सुवर्ण कर्ज आता ‘शेवटचा पर्याय’ नाही, तर ‘स्मार्ट गुंतवणूक’; कोटक महिंद्रा बँकेने स्पष्ट केला ग्राहकांचा कल

कोटक महिंद्रा बँकेने आज सांगितले की, भारतात सुवर्ण कर्ज (गोल्‍ड लोन्‍स) आता केवळ "शेवटचा पर्याय" राहिले नसून नियोजित कर्ज पर्याय म्हणून उदयास येत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 09:41 PM
Benefits Gold Loans (Photo Credit- AI)

Benefits Gold Loans (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • सुवर्ण कर्ज आता ‘शेवटचा पर्याय’ नाही
  • तर ‘स्मार्ट गुंतवणूक’
  • कोटक महिंद्रा बँकेने स्पष्ट केला ग्राहकांचा कल
Kotak Mahindra Bank Gold Loan Report 2026: कर्जदार आता वेळेचे महत्त्व असलेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी विनासायास, जलद आणि कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या सुवर्ण कर्जाचा वापर करत आहेत. कोटक महिंद्रा बँकेने आज सांगितले की, भारतात सुवर्ण कर्ज (गोल्‍ड लोन्‍स) आता केवळ “शेवटचा पर्याय” राहिले नसून नियोजित कर्ज पर्याय म्हणून उदयास येत आहे. बँकेने सांगितले की, घरामध्ये पडून असलेले पिढीजात सोने गहाण ठेवून लोक आता गृहकर्ज किंवा विनातारण कर्जाच्या तुलनेत विनासायास, जलद आणि कमी खर्चात कर्ज मिळवत आहेत.

”यामधून स्‍पष्‍टपणे ग्राहकांच्या वर्तणुकीतील बदल दिसून येतो,” असे कोटक महिंद्रा बँकेच्‍या गोल्ड लोन विभागाचे अध्यक्ष व प्रमुख श्रीपाद जाधव म्हणाले. ”सुवर्ण कर्ज आता केवळ आर्थिक संकटावर मात करण्‍याचे साधन राहिलेले नाही. स्थिर उत्पन्‍न आणि मालमत्ता असलेले ग्राहक देखील वेळेचे महत्त्व असलेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी तात्पुरते सोने गहाण ठेवून निधी उभा करत आहेत. आपल्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्याचा हा शिस्तबद्ध मार्ग आहे.”

सोन्याच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे घरामध्‍ये असलेल्‍या दागिन्यांचे मूल्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे कुटुंबांना त्यांच्या अल्प आणि मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे सोपे झाले आहे. वाढलेल्या किंमतींमुळे सोन्यावर अधिक कर्ज उपलब्ध होत आहे, ज्‍याचा नवीन संधी साधण्यासाठी वापर केला जात आहे. जाधव पुढे म्‍हणाले, ”या परिवर्तनामधून किरकोळ कर्जदार सोयीस्कर कर्ज घेण्याला प्राधान्‍य देत असल्‍याचे दिसून येते, जेथे सुवर्ण कर्जासाठी अत्यंत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.”

पहिली पसंती आणि मोठ्या प्रमाणात स्‍वीकार

कोटक महिंद्रा बँकेने निदर्शनास आणून दिले आहे की, सुवर्ण कर्ज घेण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली आले, ज्‍यामुळे सुवर्ण कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या श्रेणीत देखील मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी समाजातील एका मर्यादित वर्गापुरते मर्यादित असलेले हे उत्पादन आता सर्वव्यापी झाले आहे. जलदपणे कर्ज उपलब्‍धता, स्थिरता, सोयीसुविधा व कमी खर्चामध्‍ये कर्ज यांचा शोघ घेत असलेल्‍या पगारदार व्यावसायिक, उद्योजक आणि एचएनआय यांचा कल सुवर्ण कर्जाकडे वाढला आहे, जे व्यवसायाचा विस्तार, मुलांचे शिक्षण, मालमत्तेतील गुंतवणूक किंवा इतर तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुवर्ण कर्जाचा वापर करत आहेत.

रुपया ‘शतकी’ टप्प्याच्या आणखी जवळ… डॉलरच्या तुलनेत ९४ ची पातळी ओलांडली; जाणून घ्या सविस्तर

”खर्च आणि वेळेची बचत हा सुवर्ण कर्जाचा सर्वात मोठा फायदा आहे,” असे जाधव म्‍हणाले. ”सुवर्ण कर्जाचे व्याजदर साधारणपणे विनातारण कर्जाच्या तुलनेत कमी असतात, मंजूरी अत्यंत जलद मिळते आणि परतफेडीचे पर्याय देखील स्थिर असतात. नियोजित आर्थिक गरजांसाठी सुवर्ण कर्ज स्मार्ट साधन आहे. ग्राहकांनी आपले सोने तारण ठेवावे, निधीचा वापर करावा, कर्जाची परतफेड करावी आणि आपले दागिने सन्मानाने परत न्यावेत, इतकी ही प्रक्रिया सोपी आहे.”

कर्जाच्या सरासरी रकमेत झालेली वाढ

पूर्वी सुवर्ण कर्जाचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये दिसून येत होता. पण, आता सुवर्ण कर्जाची वाढ सर्वच क्षेत्रांत आणि स्तरांत व्यापक झाली आहे. विशेषतः २ ते १० लाख रुपयांच्या श्रेणीतील कर्जाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे, अनेक ठिकाणी सुवर्ण कर्ज मालमत्ता तारण कर्ज किंवा होम लोन टॉप-अपला पर्याय ठरत आहे. जलदपणे कर्ज मिळण्‍यासाठी ग्राहक सुवर्ण कर्जाला प्राधान्य देत आहेत. ग्राहक आता त्यांचे सोन्याचे दागिने विकण्याऐवजी ‘गहाण ठेवणे’ पसंत करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, दागिने बँकेत गहाण असताना देखील सोन्याच्या बाजारभावात होणाऱ्या वाढीचा फायदा ग्राहकाला मिळत राहतो.

”आजच्या काळात वेळेचे महत्त्व वाढले आहे,” असे जाधव पुढे म्‍हणाले. ”व्यावसायिक कुटुंबं, एमएसएमई आणि एचएनआय यांच्‍याकडे एखादी मोठी संधी साधण्यासाठी फक्त ४८ ते ७२ तासांचा वेळ असतो, तेव्हा काही मिनिटांत मंजूर होणारे सुवर्ण कर्ज त्यांच्या गरजांसाठी अत्‍यंत उपयुक्त ठरते.”

सुवर्ण कर्ज प्रमुख मालमत्ता वर्ग का ठरू शकते?

भारतातील घरगुती सोन्याचा साठा ५ ट्रिलियन डॉलर्सहून अधिक मूल्याचा आहे. यातील मोठा हिस्सा पिढीजात दागिन्यांच्या स्वरूपात आहे, जो बँकांच्या लॉकरमध्ये पडून आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील जवळपास ९० टक्‍के सोन्याचे अजूनही मुद्रीकरण झालेले नाही, म्हणजेच त्याचा आर्थिक व्यवहारात वापर झालेला नाही. संघटित क्षेत्रातील सुवर्ण कर्जाचा आकडा आधीच १५ लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. वाढीच्या बाबतीत या कर्जांनी मालमत्ता तारण कर्जाला मागे टाकले आहे. सुरक्षित रिटेल श्रेणीमध्ये आता सुवर्ण कर्ज गृहकर्जानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत सुवर्ण कर्ज स्वतंत्र आणि प्रमुख मालमत्ता वर्ग म्हणून उदयास येईल.

”’दागिने विकण्याऐवजी गहाण ठेवा’ हा सुशिक्षित आणि आर्थिक समज असलेल्या कुटुंबांसाठी आता साधा नियम बनला आहे,” असे जाधव म्‍हणाले. ”आपली दीर्घकालीन संपत्ती म्‍हणजेच सोने न गमावता संधींसाठी निधी उभा करण्याचा सुवर्ण कर्ज पारदर्शक आणि कार्यक्षम मार्ग आहे.”

Reliance Telecom Scam: सीबीआयच्या रडारवर ‘रिलायन्स’ टेलिकॉम! माजी संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

Web Title: Gold loan smart investment not last resort kotak bank report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Kotak Mahindra Bank

संबंधित बातम्या

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; DA 3 टक्क्यांनी वाढणार
1

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; DA 3 टक्क्यांनी वाढणार

स्वदेस फाउंडेशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; ग्रामीण आरोग्याला मिळणार बळ
2

स्वदेस फाउंडेशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; ग्रामीण आरोग्याला मिळणार बळ

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? नेमकी कशी होणार प्रक्रिया? कोणते निकष बदलला? सविस्तर जाणून घ्या
3

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? नेमकी कशी होणार प्रक्रिया? कोणते निकष बदलला? सविस्तर जाणून घ्या

सरकारचा मोठा निर्णय, सुकन्या समृद्धी आणि PPF सह लहान बचत योजनांच्या व्याजदरांसंदर्भात उचललं ‘हे’ पाऊल
4

सरकारचा मोठा निर्णय, सुकन्या समृद्धी आणि PPF सह लहान बचत योजनांच्या व्याजदरांसंदर्भात उचललं ‘हे’ पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.