मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाचे (Russia – Ukraine War) परिणाम अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी वाढ झाली. शुक्रवारी दिल्ली (Delhi) सराफा बाजारात सोन्याचा भाव ७५ रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) आज ४५३ रुपयांनी घसरला आहे.
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७५ रुपयांनी वाढून ५१,८६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने ५१,७८८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
[read_also content=”केंद्रीय तपास यंत्रणेवर आता मेघालय सरकारनेही घातली बंधने, सीबीआयच्या अधिकारांना कात्री लावणारे ठरले नववे राज्य https://www.navarashtra.com/latest-news/meghalaya-government-becomes-ninth-state-to-put-restrictions-on-cbi-investigation-nrsr-249300.html”]
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव ४५३ रुपयांनी घसरुन ६७,९९६ रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव ६८,४४९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.