Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Income Tax Rulesमुळे ‘HRA’ वर मिळणार मोठा करलाभ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

नवीन नियमांनुसार, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळूरु या आठ शहरांना पगाराच्या ५० टक्के इतकी उच्च सवलत मर्यादा मिळेल, तर इतर सर्व ठिकाणी ही मर्यादा ४० टक्केच राहील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 21, 2026 | 04:42 PM
Income Tax Act 1961, New Income Tax Rules 2026, Salaried Class,

Income Tax Act 1961, New Income Tax Rules 2026, Salaried Class,

Follow Us
Close
Follow Us:
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर कायदा, २०२५ साठीचे नवीन नियम अधिसूचित केले असून, हे नियम १ एप्रिल, २०२६ पासून लागू होतील
  • नवीन विधेयकामुळे आयकरातील क्लिष्टता कमी झाली असून कलमांची संख्या ८१९ वरून ५३६ पर्यंत खाली आली आहे.
  • नोकरदार वर्गाला घरभाडे भत्त्यावर (HRA) वाढीव करलाभाची सवलत मिळणार आहे. 
New Income Tax Rules 2026:  नोकरदार कर्मचारी वर्गासाठी एक गुड न्यूज आहे. सीबीडीची अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी आयकर कायदा, २०२५ साठीचे नियम अधिसूचित केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यावर वाढीव करलाभाची सवलत मिळणार आहे. मात्र, यासाठीघरमालक भाडेकरू संबंधांची माहिती देणे अनिवार्य केले आहे. येत्या १ एप्रिलपासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणर आहे.

DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार? मोदी सरकार मोठी घोषणा कधी करणार?

आयकर नियम, २०२६, गेल्या वर्षी संसदेने मंजूर केलेल्या सुलभ प्रत्यक्ष कर कायद्याची अंमलबजावणी करतील. राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, या नियमांना आयकर नियम, २०२६ म्हटले जाईल. ते १ एप्रिल, २०२६ पासून लागू होतील. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी संसदेने ६ दशके जुन्या आयकर कायदा, १९६१ च्या जागी नवीन आयकर विधेयक मंजूर केले. यामध्ये कोणतेही नवीन कर दर लागू केलेले नाहीत, तर केवळ भाषा सुलभ केली आहे. गुंतागुंतीचे आयकर कायदे समजून घेण्यासाठी हे आवश्यक होते. या कायद्याने अनावश्यक तरतुदी आणि कालबाह्य भाषा काढून टाकली आहे, ज्यामुळे आयकर कायदा, १९६१ मधील कलमांची संख्या ८१९ वरून ५३६ आणि प्रकरणांची संख्या ४७ वरून २३ पर्यंत कमी झाली आहे.

नवीन आयकर विधेयकाने शब्दसंख्या ५,१२,००० वरून २,६०,००० पर्यंत कमी केली आहे आणि स्पष्टता वाढवण्यासाठी १९६१ च्या कायद्यातील क्लिष्ट मजकुराच्या जागी प्रथमच १९६१ च्या जागी नवीन आयकर विधेयक मंजूरआणि ४० नवीन सूत्रे सादर केली आहेत. नवीन नियमांनुसार भांडवली नफा, शेअर बाजारातील व्यवहार आणि अनिवासी कर आकारणीसाठीचे नियम अधिक कठोर केले आहेत, तर इतर प्रकटीकरण यंत्रणा सुलभ केल्या आहेत. या अधिसूचनेत १५० हून अधिक अधिकृत फॉम्र्स सादर केले. आयकर नियमांनुसार पगारदार करदात्यांना लागू होणारी घरभाडे भत्ता (एचआरए) सवलतीची प्रस्तावित चौकट कायम ठेवण्यात आली आहे.

ATM Rule Change : 1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार! ‘या’ बँकेने केले मोठे बदल

नवीन नियमांनुसार, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळूरु या आठ शहरांना पगाराच्या ५० टक्के इतकी उच्च सवलत मर्यादा मिळेल, तर इतर सर्व ठिकाणी ही मर्यादा ४० टक्केच राहील. सध्या, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील पगारदार कर्मचारी त्यांच्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत घरभाडे भत्त्याची सूट मिळवू शकतात, तर इतरत्र राहणारे कर्मचारी ४० टक्क्यांच्या कमी मर्यादसाठी पात्र आहेत. नवीन नियमांनुसार, आयकर कपातीचा दावा करण्यासाठी भाडेकरू-मालक संबंधांची माहिती देणे आवश्यक आहे आणि परदेशी उत्पन्नावरील कर सवलतीच्या दाव्यांसाठी लेखापरीक्षक व कंपन्यांची जबाबदारी वाढवण्यात आली आहे. पॅन क्रमांकाची पुनरावृत्ती आणि प्रतिकूल लेखापरीक्षण शेऱ्यांमुळे निर्माण होणारी कर जबाबदारी तपासण्याची अधिक जबाबदारी लेखापरीक्षकांना देण्यात आली आहे.

 

जुना आयकर कायदा अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक शब्दांनी भरलेला होता. जुन्या नियमावलीत तब्बल ५,१२,००० शब्द होते, ते आता नव्या कायद्यात २,६०,००० पर्यंत मर्यादित करण्यात आले आहेत. तसेच, जुन्या कायद्यातील ८१९ कलमांची संख्या घटवून आता ती फक्त ५३६ वर आणली आहे. यामुळे करदात्यांना आणि कर सल्लागारांना नियमांचे आकलन होणे अधिक सोपे होणार आहे.

US-Israel Iran War : तेल आणि गॅससाठी भारत इतर देशांवर किती अवलंबून ? २०२४-२५ च्या आकडेवारीवारी समोर

HRA सवलतीत वाढ आणि शहरनिहाय मर्यादा नोकरीपेशा असलेल्या वर्गासाठी घरभाडे भत्ता (HRA) संदर्भात मोठे बदल करण्यात आले आहेत:

५०% सवलत: नव्या कायद्यानुसार, मेट्रो शहरांमधील कर्मचारी ५० टक्क्यांपर्यंत HRA सवलतीसाठी पात्र ठरतील.

इतर शहरे: मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमधील रहिवाशांसाठी ही मर्यादा ४० टक्के निश्चित करण्यात आली आहे.

 

 

 

Web Title: Good news for salaried class cbdt notifies income tax rules 2026 with enhanced hra benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • income tax

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.