(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या योजनेची घोषणा गोवा सरकारने केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन एलपीजी सिलिंडरच्या खर्चासाठी वार्षिक ३,००० रुपये मिळतील. गोवा सरकारने ‘गोवा उज्ज्वला योजना २०२६’ ला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील पात्र कुटुंबांना तीन घरगुती एलपीजी सिलिंडर किंवा पीएनजीच्या खर्चाएवढी, म्हणजेच वार्षिक ३,००० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. ही योजना २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा एक भाग होती. सरकारने जनतेला आश्वासन दिले होते की, दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील.
लाभार्थ्यांना ९ सप्टेंबरपासून त्यांच्या बँक खात्यात ३,००० रुपयांची वार्षिक रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. या सरकारी योजनेचा उद्देश दरवर्षी तीन LPG सिलिंडरचा खर्च भागवणे हा आहे. स्वतंत्र सिलिंडर देण्याऐवजी, सरकार ही रक्कम थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जे रहिवासी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे सादर करतील, त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळण्यास सुरुवात होईल.
गोव्याच्या या मोफत LPG/PNG सिलिंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू ठेवली आहे. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही अर्ज करु शकता.






