Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलने घेतलाय हा महत्वाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलची बैठक सोमवारी (ता.९) पार पडली. या बैठकीत धार्मिक तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक यात्रा करणाऱ्यांना यापुढे हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेण्यासाठी १८ टक्क्यांऐवजी केवळ ५ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे आता धार्मिक तीर्थयात्रा करणाऱ्यांना केदारनाथ आणि बद्रीनाथसारख्या दुर्गम भागात जाण्यासाठी होणारा खर्च कमी होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 09, 2024 | 05:25 PM
तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलने घेतलाय हा महत्वाचा निर्णय

तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलने घेतलाय हा महत्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलची बैठक सोमवारी (ता.९) पार पडली आहे. या बैठकीत धार्मिक तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. आज झालेल्या या बैठकीत आता धार्मिक यात्रा करणाऱ्यांना हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेण्यासाठी १८ टक्क्यांऐवजी केवळ ५ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना याबाबत सांगितले आहे.

उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्याला मोठा फायदा होणार

उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी आज (ता.९) आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलची बैठकीत ही मागणी केली होती. ज्यास आता जीएसटी परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता याचा उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्याला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय राज्यातील धार्मिक पर्यटनही वाढण्यासही मदत होणार आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथसारख्या दुर्गम भागात जाण्यासाठी वृद्धांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.

हे देखील वाचा – कधीकाळी करत होते 80 रुपये मजुरी; आज दुग्ध व्यवसायातून करतायेत वार्षिक 8 कोटींचा टर्नओव्हर!

या मुद्द्यांचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार 

याशिवाय शैक्षणिक संस्थांना संशोधनासाठी मिळणाऱ्या अनुदानावरील जीएसटीचा मुद्दा सध्या फिटमेंट समितीकडे पाठवण्यात आला आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर जीएसटी परिषद याबाबत निर्णय घेणार आहे. याशिवाय ऑनलाइन पेमेंटवरील जीएसटीचे प्रकरणही फिटमेंट कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान, जीएसटी कौन्सिलच्या ५४ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती नंतर दिली जाईल. जीएसटी परिषदेची शेवटची बैठक 22 जून 2024 रोजी झाली होती. या समितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांशिवाय सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा – गौतम अदानी चीनमध्ये आपली पाळे-मुळे पसरवणार; स्थापन केली नवीन कंपनी!

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी रविवारी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आप दोन प्रस्तावांना विरोध करणार आहे. यापैकी एक म्हणजे शैक्षणिक संस्थांना मिळणाऱ्या संशोधन अनुदानावरील जीएसटीचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे 2000 रुपयांपेक्षा कमी ऑनलाइन व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा प्रस्ताव या दोन प्रस्तावांना विरोध करणार असल्याचे आतिशी यांनी म्हटले होते. त्यामुळे आता हे दोन्ही मुद्दे फिटमेंट समितीच्या कोर्टात फेकले गेले आहे.

Web Title: Gst council big decision people who want to enjoy helicopter rides have to only 5 percent gst instead of 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 04:58 PM

Topics:  

  • Finance Minister
  • GST Council
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?
1

Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?

५ वर्षांत ७ लाख कोटी रुपयांची GST चोरी उघड, अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती, जाणून घ्या
2

५ वर्षांत ७ लाख कोटी रुपयांची GST चोरी उघड, अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती, जाणून घ्या

BJP President : भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं चर्चेत, RSS कडूनही पाठिंबा
3

BJP President : भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं चर्चेत, RSS कडूनही पाठिंबा

RBI नंतर आता SBI नेही सरकारला दिलं भरभरून; तब्बल 8076.84 कोटींचा दिला लाभांश
4

RBI नंतर आता SBI नेही सरकारला दिलं भरभरून; तब्बल 8076.84 कोटींचा दिला लाभांश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.