कधीकाळी करत होते 80 रुपये मजुरी; आज दुग्ध व्यवसायातून करतायेत वार्षिक 8 कोटींचा टर्नओव्हर!
सध्याच्या घडीला अनेक जण नोकरीऐवजी शेती तसेच शेतीआधारीत उद्योगांना प्राधान्य देताना दिसून आहे. अनेक जण शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध उत्पादनाला प्राधान्य देत आहे. दुग्ध व्यवसाय करताना जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांना मोठे यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका दुध उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी मोठ्या आर्थिक संघर्षातून डेअरी व्यवसायात स्वत:ची एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आज ते आपल्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल वार्षिक 8 कोटींचा टर्नओव्हर करत आहेत.
कसे वळाले दुग्ध व्यवसायाकडे?
रमेश रूपरेलिया असे या दुध उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून, ते गुजरातमधील गोंडल या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीच्या पुर्ण क्षमतेने शेतीवर लक्ष केंद्रित करत होते. अशातच त्यांना एक वर्षी कांदा पिकाला चागंला भाव मिळाल्याने तब्बल ३५ लाख रुपयांची कमाई झाली. याच कमाईच्या जोरावर त्यांनी दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी गीर गाईंची खरेदी केली. आज ते ‘श्री गिर गौ कृषि जतन संस्था’ नावाने गाईंचा सांभाळ देखील करतात. तर गीर गाईच्या दुधापासून बनलेल्या सेंद्रिय तुपाच्या माध्यमातून ते सध्या कोट्यवधींची उलाढाल करत आहे.
हे देखील वाचा – 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10 टक्के जीएसटी भरावा लागणार? उद्या होणार निर्णय…
उभा केलाय तब्बल ८ कोटींच्या टर्नओव्हरचा दुग्ध व्यवसाय
विशेष म्हणजे त्यांची स्वतची कोणतीही जमीन नसताना त्यांनी गोंडल येथे एका जैन परिवाराची जमीन भाडेतत्वावर घेऊन, शेती करणे सुरु केले होते. त्यातून त्यांना कांदा उत्पादन मिळाले. ते यापुर्वी शेतात दुसऱ्या दुध उत्पादकांकडून शेणखत, गोमुत्र घेऊन शेती करत होते. दुग्घ व्यवसायात उतरल्यानंतर रमेश रूपरेलिया यांनी स्वतच्या गीर गाईच्या शेणाच्या आणि गोमुत्राच्या वापर करणे सुरु केले. विशेष म्हणजे गीर गाईच्या पालनातून त्यांना शेतीत मोठा फायदा झाला आहे. स्वतची कोणतीही जमीन नसताना आजपर्यंतच्या जिद्दीतून तब्बल ८ कोटींच्या टर्नओव्हरचा दुग्ध व्यवसाय उभा केला आहे.
सायकलवर विकायचे दुध
रमेश रूपरेलिया हे सुरुवातीच्या काळात सायकलवर दुध विक्री करायचे. त्यानंतर त्यांनी एका छोटीशी खोली भाडेतत्वाने विकत घेत तुप बनवणे सुरु केले. त्यानंतर त्यांनी हे तुप प्लास्टिक आणि काचेच्या बरणीतून तुप विकणे सुरु केले. त्यांची तुप विक्री ग्राहकांच्या खुपच पसंतीस उतरली. त्यामुळे त्यांनी शुद्ध तुप बनवणे सुरु केले. त्यामुळे त्यांनी गायींना योग्य तो आहार देत तुप बनवण्याच्या उद्योगावर पुर्णपणे लक्ष केंद्रित केले. ज्यामुळे त्यांना या व्यवसायातून मोठा फायदा झाला.
१२३ देशांमध्ये चालतोय व्यवसाय
रमेश रूपरेलिया यांनी गीर गायींपासून औषधी तुप बनवणे सुरु केले. जे खुप लोकप्रिय झाले. त्यांचा हा व्यवसाय सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात वाढला असून, ते आपली दुग्धजन्य उत्पादने १२३ देशांमध्ये निर्यात करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी काही गायींपासून सुरु केलेला व्यवसाय आता २५० गीर गायींपर्यंत पोहोचला आहे. ते आपल्या व्यवसायातून वार्षिक ८ कोटींची कमाई करत आहेत. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा नव्याने शेतीआधारित उद्योगांमध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.