दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानींची छप्परफाड कमाई; तासाला कमावले इतके हजार कोटी!
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसाय करणाऱ्या दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी आता ‘ड्रॅगन’ किल्ल्यामध्ये पाय रोवले आहेत. अदानी यांनी चीनमधील शांघाय शहरात आपली कंपनी सुरू केली आहे. चीनमध्ये कंपनी सुरू करणे, ही अदानी समूहासाठी एक धोरणात्मक वाटचाल आहे. याचा फायदा अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांना होणार आहे. ही कंपनी चीनमध्ये अदानी समूहासाठी नवीन बाजारपेठ उघडण्यास मदत करणार आहे.
काय आहे कंपनीचे नाव?
अदानी ग्रुपने सप्लाय चेन सॉल्यूशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी चीनमध्ये एक कंपनी स्थापन केली आहे. अदानी एंटरप्रायझेसने सांगितले आहे की, त्यांच्या सिंगापूरस्थित उपकंपनीने 2 सप्टेंबर 2024 रोजी चीनमधील शांघाय येथे अदानी एनर्जी रिसोर्सेस (शांघाय) कंपनी या नावाने एका कंपनीची स्थापना केली आहे.
हे देखील वाचा – पर्सनल लोन घेताना काय काळजी घ्यावी, कर्जदारांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या…
अदानी एनर्जी रिसोर्सेस ही कंपनी खाणकाम, रस्ता, विमानतळ, डेटा सेंटर आणि वॉटर इन्फ्रा व्यवसायात गुंतलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी एनर्जी रिसोर्सेस (शांघाय) कंपनी (AERCL)ची स्थापना आणि नोंदणी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कंपनी कायद्यानुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे. कंपनीने अद्याप त्यांचे व्यावसायिक कामकाज सुरू केलेले नाही.
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स
दरम्यान, शुक्रवारी (ता.6) अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 1.25 टक्क्यांची घसरण दिसून आली. कंपनीचा शेअर 38 रुपयांच्या घसरणीसह 2976.85 रुपयांवर बंद झाला. 3 जून रोजी कंपनीने 3,743 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. शुक्रवारी कंपनीच्या मार्केट कॅपला 18,692.79 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे कंपनीचे मूल्यांकन 3,39,361.23 कोटी रुपयांवर आले आहे.
हे देखील वाचा – जगातील सर्वात महागडे बेट, ज्या ठिकाणी एक दिवस थांबायचे भाडे आहे तब्बल 84 लाख रुपये!
नैरोबी विमानतळासाठी उपकंपनी
अलीकडेच अदानी एंटरप्रायझेसने केनियामध्ये उपकंपनी एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर पीएलसीची नोंदणी केली होती. भारतातील 7 विमानतळांचे व्यवस्थापन करणारी कंपनी आता परदेशातही आपला ठसा वाढवत आहे. या क्षेत्रात गुंतवणूक मिळवण्यासाठी, ग्लोबल एअरपोर्ट्स ऑपरेटर एलएलसी नावाची कंपनी नुकतीच अबू धाबीमध्ये स्थापन करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाने नैरोबी येथील जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुंतवणुकीसाठी केनिया सरकारला प्रस्ताव सादर केला होता. देशाबाहेरील अदानी समूहाचे हे पहिले विमानतळ होऊ शकते.