Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST Registration Process : लहान दुकानदारांना मोठा दिलासा! 1 नोव्हेंबरपासून GST नोंदणी होणार सोपी; जाणून घ्या नवीन नियम

GST Registration Process : देशातील लहान दुकानदार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून GST नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक केली जाणार आहे. कागदपत्रांची कटकट आणि मंजुरीला लागणारा वेळ कमी करून लहान व्यापाऱ्यांना व्यवसायाला गती मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 23, 2026 | 02:35 PM
लहान दुकानदारांना मोठा दिलासा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

लहान दुकानदारांना मोठा दिलासा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • लहान दुकानदारांना मोठा दिलासा!
  • 1 नोव्हेंबरपासून GST नोंदणी होणार सोपी
  • जाणून घ्या नवीन नियम
GST Registration Process : देशातील लहान दुकानदारांसह सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. लहान ई-कॉमर्स विक्रेत्यांसाठी वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST नोंदणीची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे. ही प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरु होईल. नुकतेच ५७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नेमका काय आणि कसा होणार फायदा? सविस्तर समजून घेऊयात. ( GST Registration Process ) 

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया ASSOCHAM द्वारे आयोजित एका कार्यक्रमात नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुलभ नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक प्रणालीगत बदल पूर्ण झाले आहेत आणि ही सुविधा पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून जीएसटी पोर्टलवर उपलब्ध होईल, असं स्पष्ट केलं .

नवीन नियम काय आहे?

परिषदेने केंद्रीय वस्तू आणि सेवा कर CGST नियम, २०१७ च्या नियम १४बी अंतर्गत एक सुलभ आणि ऐच्छिक नोंदणी प्रक्रिया प्रस्तावित केली आहे. या व्यवस्थेअंतर्गत, ई-कॉमर्स साइट्सवर वस्तू विकणारे छोटे विक्रेते इतर राज्यांमध्येही नोंदणी करू शकतील. त्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे गोदाम हे त्यांचे मुख्य व्यवसाय ठिकाण म्हणून घोषित करावे लागेल. त्यांना त्या राज्यांमध्ये स्वतंत्र कार्यालय किंवा दुकान उघडण्याची आवश्यकता भासणार नाही.

पूर्वी, जर एखाद्या विक्रेत्याला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या माध्यमातून इतर राज्यांमधील गोदामांमध्ये आपला माल साठवायचा असेल, तर त्यांना त्या राज्यात प्रत्यक्ष कार्यालय असल्याचे सिद्ध करावे लागायचं. नवीन नियमानंतर आता ही अट काढून टाकली आहे. पूर्वीच्या नियमामुळे इतर राज्यांमध्ये कार्यालये भाड्याने घेणे, विजेची बिले भरणे आणि भाडेकरार तयार करणे यांसारख्या अनेक अडचणी येत होत्या. मात्र, नवीन नियमानुसार, विक्रेते ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या फुलफिलमेंट सेंटर्स किंवा गोदामांमध्ये आपला माल साठवू शकतील आणि इतर राज्यांमधील ग्राहकांना अधिक वेगाने डिलिव्हरी करू शकतील.

२० लाख रुपयांपेक्षा कमी उलाढालीसाठी दिलासा

नवीन नियमानुसार, २० लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या लहान ई-कॉमर्स ऑपरेटर्सना TCS वसुलीतून सूट मिळेल आणि जीएसटीच्या मर्यादेचा पूर्ण लाभ मिळेल. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे एका लहान ऑफलाइन दुकानदाराला २० लाख रुपयांपर्यंतच्या उलाढालीवर कोणताही कर भरण्यापासून सूट आहे, त्याचप्रमाणे ही सुविधा आता ऑनलाइन विक्रेत्यांनाही लागू होईल. आता कोणतीही कर कपात होणार नसल्यामुळे, त्यांच्या दैनंदिन व्यवसायासाठी अधिक पैसे उपलब्ध होतील.

Festive Orders : सणासुदीत Swiggy चे रेकॉर्ड ब्रेक ऑर्डर्स; उपवासाच्या पदार्थांपासून ते मिठाईपर्यंत… भारतीयांनी खवय्यांची धमाल!

💡

Frequently Asked Questions

  • Que: १ नोव्हेंबरपासून GST नोंदणी प्रक्रियेत काय मुख्य बदल होणार आहेत?

    Ans: १ नोव्हेंबरपासून लहान व्यापाऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया डिजिटल आणि अधिक सुलभ केली जाईल, ज्यामध्ये कागदपत्रांची पडताळणी जलद होईल आणि अनावश्यक अटी रद्द केल्या जातील.

  • Que: नवीन निर्णयाचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार आहे?

    Ans: याचा सर्वाधिक फायदा सूक्ष्म, लहान व्यापारी, स्थानिक दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन व्यावसायिकांना होईल.

  • Que: GST नोंदणी सोपी झाल्यामुळे लहान व्यापाऱ्यांना काय लाभ मिळेल?

    Ans: व्यापाऱ्यांना जीएसटी नंबर मिळवण्यासाठीचा वेळ वाचेल, मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होईल आणि औपचारिक अर्थव्यवस्थेशी जोडून व्यवसाय वाढवणे शक्य होईल.

Web Title: Gst registration simplified for small shopkeepers from november 1st ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • GST
  • MSME

संबंधित बातम्या

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
1

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.