Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Nagpur News : जीएसटी महसूल वाढविण्यासाठी प्रशासनाने आता कारवाईपेक्षा सहकार्य आणि विश्वासाला प्राधान्य देण्याची रणनीती आखली आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांना जीएसटीच्या कक्षेत आणणे, करप्रणालीबाबत जनजागृती करणे आणि स्वेच्छेने कर भरण्यास प्रोत्साहन देणे, यावर भर दिला जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 17, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • जीएसटीतील प्रस्तावित बदल
  • व्यापाऱ्यांसाठी अधिकारी मदतीच्या भूमिकेत 
  • दर न्हवे आता प्रक्रियेवर चर्चा
Nagpur News :जीएसटीच्या अंमलबजावणीला ९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने करसंकलन वाढविण्यासाठी आपली रणनीती बदलण्याचे संकेत दिले आहेत. करचोरी शोधण्यासाठी व्यापाऱ्यांवर थेट कारवाई किंवा अनावश्यक दबाव टाकण्याऐवजी आता डेटा अॅनालिसिस आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश केंद्र व राज्यातील जीएसटी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कर संकलनात सध्या १४-१५ टक्क्यांची वाढ होत असून ती स्थिर पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे महसूल वाढविण्याचा पुढील मार्ग अधिकाधिक करदात्यांना करजाळ्यात आणणे हाच असल्याचे सरकारचे मत आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील अडचणी, सूचना तसेच अपेक्षा जाणून घेण्यासाठी जीएसटी नागपूर झोनकडून ‘फीडबॅक’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष विवेक चतुर्वेदी आणि सदस्य संजय मंगल यांनी व्यापारी व उद्योजकांशी थेट संवाद साधला. शहरातील प्रमुख उद्योजक, व्यापारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले. नागपूर झोनचे मुख्य आयुक्त संदीप पुरी आणि अपर आयुक्त मुकुल पाटील यांचीही उपस्थिती होती. चतुर्वेदी यांनी सांगितले की, आता करव्यवस्था अधिक चालना देण्याचे धोरण आहे. कायदा जितका सुलभ असेल, तितके लोका स्वेच्छेने करव्यवस्थेत सहभागी होतील.

Nagpur News : यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

जीएसटीतील प्रस्तावित बदल

अटकेच्या तरतुदीत दिलासा ,जीएसटी कायद्यांतर्गत अटक करण्याची तरतूद रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. खटला चालविण्यासाठीची किमान मर्यादाही १ कोटीवरून वाढवून ५ कोटी रुपये करण्यात आली आहे. दंडाची रक्कम घटली किमान शिक्षा अनिवार्य करण्याची तरतूद हटविण्यात आली आहे.

विशिष्ट दंडाची तरतूद नसलेल्या प्रकरणांत सामान्य दंड २५,००० रुपयांवरून थेट १०,००० रुपये करण्यात आला आहे. रिफंडची प्रक्रिया वेगवान रिफंड दाव्याची पावती देण्याची मुदत १५ दिवसांवरून कमी करून १० दिवस करण्यात आली आहे. ३ दिवसांत ९० टक्के रिफंड जोखीम आधारित मूल्यांकनाच्या प्रक्रियेत पावती मिळाल्यानंतर ३ कार्यदिवसात ९० टक्के पात्र रिफड दाव्याना मजुरी देऊन रिफंड ऑर्डर जारी केली जाणार आहे.

नागपूर-वैनगंगा मार्गाचा कायापालट; 42 किमीचा सिक्स लेन एक्सप्रेस-वे, विस्ताराला गती

व्यापाऱ्यांसाठी अधिकारी मदतीच्या भूमिकेत

सजय मगल यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या ‘प्रेमाने नियमाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे’ या संकल्पनेप्रमाणे जीएसटी विभागही आता काम करणार आहे. व्यापाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात अधिकाऱ्याऱ्यांनी विनाकारण हस्तक्षेप करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

करदात्यांना मार्गदर्शन करणारा आणि त्यांच्या अडचणी सोडविणारा ‘मदतगार म्हणून अधिकारी काम करतील. बैठकीला प्रशांत मोहता, मालपानी निर्भय संचेती, अजय गुप्ता, दीपेन अग्रवाल, शशिकांत कोठारकर, किशोर मालवीय, जुल्फेश शाह, स्वप्निल अहिरकर आणि हेमंत सारडा उपस्थित होते.

दर न्हवे आता प्रक्रियेवर चर्चा

जीएसटी नोंदणीपासून रिफंड मिळेपर्यंतच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यावर आता भर दिला जात आहे. कौन्सिलनेही व्यापा-यऱ्यांच्या या अपेक्षा लक्षात घेतल्या आहेत. देशभरातील व्यापारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून सूचना घेतल्या जात आहेत. प्राप्त सूचनांचा अभ्यास करून ३ महिन्यांत अहवाल तयार केला जाणार असून, त्यानंतर सुधारणा प्रक्रियेला आणखी गती देण्यात येईल.

Web Title: Nagpur news no fear for taxpayers but the strength of trust a new campaign to expand the gst base cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • GST
  • Marathi News
  • Nagpur News
  • tax

संबंधित बातम्या

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
1

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
2

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
3

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
4

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.