एचएडीएफसी बँकेने केले कर्जाचे दर कमी
जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज, कार लोन किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल, तर बँकेने तुम्हाला नवीन वर्षात भेटवस्तू दिली आहे. आपल्या लाखो ग्राहकांना दिलासा देत, एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकाने कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. बँकेने निधीवर आधारित कर्ज दर (MCLR) च्या किरकोळ किमतीत कपात केली आहे. बँकेने काही निवडक कालावधीसाठी MCLR दर 5 बेस पॉईंटने कमी केला आहे.
व्याज दर केला कमी
HDFC बँकेने ओव्हरनाईट MCLR दर 5 bps ने 9.20% वरून 9.15% पर्यंत कमी केला आहे. नवीन सुधारित व्याजदर आजपासून लागू झाले आहेत. आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत की, MCLR दर कमी झाल्यामुळे व्याजदरही कमी होतील. व्याजदरात घट म्हणजे ईएमआयमध्ये घट. त्याचा लाभ त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांचे कर्ज SCLR शी लिंक आहे. एचडीएफसी बँकेचे आधीचे व्याजदर हे सामान्य लोकांना परडवण्यासारखे नव्हते असंही म्हटलं जातं. पण आता ज्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. यामुळे घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही नवे दरवाजे खुले झाले असल्याचे दिसून येत आहे.
व्याजदरात कपात केल्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यवसाय कर्जासारख्या जुन्या फ्लोटिंग रेट कर्जांचा ईएमआय कमी होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की MCLR दर हा दर असतो ज्यावर कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते. ज्या बँकेने लोकांना कर्ज दिले त्या बँकेकडून घेतलेला हा किमान व्याजदर आहे.
मांसाहारी थाळीची वाढली किंमत; शाकाहारी खाणाऱ्यांना दिलासा, काय स्वस्त काय महाग
काय आहे नवा व्याजदर?
‘पुढच्या जन्मी…’, टॅक्स तरी करा कमी किंवा बदला मध्यमवर्गींयांची परिभाषा, 10 लाखही पडू लागले कमी
नव्या जुन्या ग्राहकांवर परिणाम
MCLR मधील बदल तुमच्या कर्जाच्या व्याजदर आणि EMI वर थेट परिणाम करेल. एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या नवीन आणि जुन्या ग्राहकांचा ईएमआय कमी होईल. जर तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर HDFC च्या MCLR मध्ये कपात केल्यामुळे तुम्हाला स्वस्त कर्ज मिळू शकेल. ज्यांचे कर्ज आधीच चालू आहे, त्यांचा EMI कमी होईल आणि कर्जफेड लवकर करण्यासाठी त्यांचा हातभार लागू शकतो जे नव्या वर्षात नक्कीच आनंददायी असल्याचे आता बोलले जात आहे