मुंबई : नववर्ष २०२३ (New Year) ची सुरूवात उत्साहात करत नेस्ले मॅगी ग्राहकांना (Nastle Maggi Customers) आपल्या मॅगी सुपर बोनान्झा ऑफरसह (Maggi Super Bonanza Offer) दर ३० मिनिटांनी गोल्ड वाऊचर्स (Gold Vouchers) जिंकण्याची (Wins) संधी देत आहे. या ऑफरचा भाग म्हणून देशभरातील ग्राहकांना प्रत्येकी ९,९९९ रूपयांचा गोल्ड वाऊचर जिकण्याची संधी आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना नेस्ले इंडियाच्या फूड बिझनेसचे प्रमुख रजत जैन म्हणाले, ‘‘मॅगी गेल्या ४० वर्षांपासून ग्राहकांच्या जीवनात आनंद व उत्साह आणत आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी सुपर बोनान्झा ऑफरसह या नवीन वर्षाची सुरूवात करताना आनंद होत आहे, जेथे त्यांना दर ३० मिनिटांनी गोल्ड वाऊचर जिंकण्याची संधी आहे. आम्ही ही ऑफर मॅगी पोर्टफोलिओमधील १५ कोटी पॅक्सपर्यंत विस्तारित करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, मॅगीच्या ग्राहकांना ही ऑफर आवडेल आणि त्यामधून फायदा होईल.’’
मोहीम विस्तारीकरणाचा भाग म्हणून ब्रॅण्डने जाहिरात देखील लाँच केली आहे. या जाहिरातीची संकल्पना व निर्मिती मॅककॅन वर्ल्डग्रुपने केली आहे.
जानेवारी २०२३ मध्ये मॅगी सुपर बोनान्झा ऑफर भारतातील अनेक राज्यांमधील प्रत्येक ग्राहकासाठी लाँच करण्यात आली आहे आणि आता जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक तनिष्क, जोयालुक्कास, कल्याण ज्वेलर्स, ब्ल्यूस्टोन या ४ आऊटलेट्सपैकी कोणत्याही आऊटलेटमध्ये हे वाऊचर्स रिडिम करू शकतात. गोल्ड वाऊचर जिंकण्याची संधी १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत वैध आहे.