
नव्या वर्षात गर्भवती महिलांनी घ्यायची काळजी (फोटो सौजन्य - iStock)
सेलिब्रेशनसाठी निवडा आरामदायी ठिकाण
तुम्हाला आराम करण्याची परवानगी देणारे ठिकाण निवडणे गरजेचे आहे. मग, ते घरातल्या घरात साजरे केले जाणारे सेलिब्रेशन असो घराच्या छतावरील शांत दृश्य असो किंवा आरामदायी लाऊंज असो. जास्त गर्दी, गोंधळ असलेली ठिकाणं शक्यतो टाळा. जर तुम्ही गर्भवती असाल, तर जिथे शौचालयाचा वापर करणे सहज शक्य होईल अशी जागा निवडा किंवा घरी आरामात बसुन पार्टी करणे हा देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
योग्य कपडे घाला:
शरीर उबदार राहण्यासाठी आणि आरामदायी वाटण्यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला. साधारण डिसेंबर महिन्यात थंडी असते आणि अशावेळी स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे. थंडीत शरीर उबदार राहण्यासाठी स्वेटर, स्वेटशर्ट आणि तत्सम कपडे घालण्याची गरज आहे. Pregnant महिलांनी सर्दी खोकला न होण्यासाठी ही काळजी न विसरता घ्यावी.
हायड्रेटेड रहा
गर्भवती महिलांनी भरपूर पाणी तसेच द्रवपदार्थांचा आहारात समावेश करा. आहारात विविध भाज्यांचे सूप घेण्याचा प्रयत्न करा. जड किंवा चरबीयुक्त पदार्थांपेक्षा हलक्या, हेल्दी स्नॅक्सचा आनंद घ्या. हे अपचन टाळण्यास, तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यास नक्कीच मदत करेल.
तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या. निरोगी आहाराच्या सवयीचे पालन करा. तळलेले पदार्थ, फ्रेंच फ्राईज आणि पास्ताऐवजी तुमच्या जेवणात सॅलड, भात आणि डाळ किंवा भाजी पुलाव यांचा समावेश करा. शरीराने दिलेले संकेत ओळखा. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल,चक्कर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. पुरेशी विश्रांती घ्या आणि मगच एखाद्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हा.
धूर, मद्यपान आणि मोठा आवाज यापासून दूर राहा
अशी जागा शोधणे आवश्यक आहे जिथे तुम्ही ताजी हवा मिळवू शकाल, जास्त आवाज टाळू शकाल आणि शांत राहू शकाल. तुमचे बाळ आणि तुम्ही सौम्य परिसराची प्रशंसा कराल. अशावेळी Passive Smoking देखील त्रासदायक ठरू शकते. याशिवाय धुराचा त्रासही बाळाला होऊ शकतो. त्यामुळे धूर, प्रदूषण अथवा मद्यपान, धुम्रपान कोणी करत असेल तर अशा ठिकाणी थांबणे टाळा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरामदायी वातावरण, शरीर हायड्रेटेड राखणे, पुरेशी विश्रांती आणि गर्दी, गोंधळ टाळत गर्भवती माता देखील नवी वर्षाच्या स्वागतामध्ये सहभागी होऊ शकतात आणि येत्या नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करू शकतात.