आता रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार? जाणून घ्या नेमका निर्णय काय?
तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईक किंवा मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेला असेल. तर आपल्याला १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागते. अन्यथा रेल्वे विभागाकडून आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. मात्र, आता याच प्लॅटफॉर्म तिकीटबाबत अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे प्लॅटफॉर्म तिकीट नेमके किती तास वैध असते. प्लॅटफॉर्म तिकीट असेल तर आपण रेल्वे स्टेशनवर नेमके किती वेळ थांबू शकते. हे जाणुन घेऊया…
प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक
देशभरात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत लोकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. जर एखादी व्यक्ती आपल्या नातेवाईक, ओळखीच्या किंवा मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेली तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक असते. अन्यथा रेल्वे विभागाकडून आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. विशेष म्हणजे तुम्ही काढलेले प्लॅटफॉर्म तिकीट नेमके किती वेळ लागू असते. हे माहिती नसेल तर तुम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
हेही वाचा – शेअर बाजारात लवकरच येणार ‘हा’ 2000 कोटींचा आयपीओ; गुंतवणुकीची मोठी संधी!
का काढावे लागते प्लॅटफॉर्म तिकीट
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम तयार केले आहेत. रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट काढणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटाशिवाय रेल्वे स्टेशनवर गेलात तर अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. रेल्वेच्या नियमानुसार प्लॅटफॉर्म तिकीटाशिवाय रेल्वे स्थानकावर जाण्यास बंदी आहे.
हेही वाचा – अदानी समुह आणखी एक कंपनी खरेदी करणार; 4101 कोटींमध्ये झालीये डील!
प्लॅटफॉर्म तिकीट नेमके किती तास वैध असते
मात्र, अनेकदा प्रवाशांच्या मनात प्रश्न असतो की, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही किती वेळ प्लॅटफॉर्मवर राहू शकतात. अनेकांना असे वाटते की, प्लॅटफॉर्म तिकीट संपूर्ण दिवसासाठी वैध आहे. प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपये आहे. हे तिकीट दिवसभर वैध नसून, फक्त दोन तासांसाठी वैध असते. दरम्यान जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटशिवाय रेल्वे स्टेशनवर पकडले गेलात तर अशा परिस्थितीत तुम्हाला किमान 250 रुपये दंड भरावा लागू शकतो.