20 हजार कोटींची गुंतवणूक, 12 हजार नोकऱ्या निर्माण होणार; अदानी समुह 'या' ठिकाणी उभारणार औष्णिक ऊर्जा प्रकल्प
अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडून (एनसीएलटी) लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहणास मंजुरी मिळाली आहे. एनसीएलटी हैदराबाद खंडपीठाने छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील पाथाडी गावात असलेल्या या कंपनीच्या खरेदी करारास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अदानी पॉवरला ही कंपनी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अदानी पॉवर कंपनी आणि लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड यांच्यातील हा करार तब्बल 4,101 कोटी रुपयांचा असणार आहे.
बीएसई फाइलिंगमध्ये कंपनीने दिली माहिती
याबाबत मुंबई शेअर बाजारात बीएसई फाइलिंगमध्ये माहिती देताना कंपनीने माहिती दिली की, लॅन्को अमरकंटक दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेमधून जात आहे. याशिवाय कंपनी मोठ्या कर्जाखाली दबलेली आहे. ज्यामुळे कंपनीची विक्री केली जात आहे. अशातच आता अदानी पॉवरला या कंपनीच्या अधिग्रहणासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र, काही अटींवर अदानी पॉवरला या कंपनीची खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा – घरांच्या किंमती वाढणार की घटणार? पाहा… काय सांगतोय रिअल इस्टेट क्षेत्रातील अहवाल!
100 टक्के हिस्सा खरेदी करणार
बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, अदानी पॉवर ही कंपनी रोख पेमेंटच्या बदल्यात लॅन्को अमरकंटकमधील 100 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. अर्थात हा करार पुर्ण झाल्यानंतर अदानी पॉवरकडे लॅन्को अमरकंटक कंपनीचे पूर्ण अधिकार असणार आहे. ही कंपनी छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील पाथडी गावात 600 मेगावॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवते. त्यामुळे आता हा प्रकल्प लवकरच अदानी समुहाकडे येणार आहे.
अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत
लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड कंपनीचे हा खरेदी करार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मंजुरी तारखेपासून 60 दिवसांच्या आत, अर्थात 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करायचा आहे. लॅन्को अमरकंटक ही वीज निर्मिती क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. दरम्यान, आता हा करार पुर्ण झाल्यानंतर 15,850 मेगावॅटच्या एकत्रित ऑपरेटिंग वीज निर्मिती क्षमतेसह भारतातील आघाडीचे खासगी क्षेत्रातील वीज उत्पादक म्हणून अदानी पॉवर लिमिटेडची ओळख निर्माण होणार आहे. या कराराची माहिती समोर आल्यानंतर अदानी पॉवरचे शेअर्स शुक्रवारी 1.08 टक्क्यांनी वाढून, 681 रुपयांवर व्यवहार करत होते.