फोटो सौजन्य: iStock
मागील काही वर्षांपासून खासकरून Covid 19 नंतर अनेक गुंतवणूकदार झटपट पैसा कमावता यावा म्हणून विविध कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करत आहेत. तसेच कित्येक कंपन्यांच्या आयपीओने गुंतवणूकदारांना फक्त एका दिवसातच चांगला परतवा मिळवून दिला आहे. म्हणूनच तर आता अनेक कंपन्यांचे आयपीओ लाँच होताच लगेच ओव्हरसबस्क्राइब होत असतात.
Urban Company चा आयपीओ देखील लगेचच ओव्हरसबस्क्राइब झाला आहे. शुक्रवारी बोलीच्या शेवटच्या दिवशी हा आयपीओ 108.98 पेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाला आहे. आता गुंतवणूकदार त्याच्या अलॉटमेंटची वाट पाहत आहेत. आयपीओ अलॉटमेंट येत्या सोमवार, 15 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. एकदा ते अंतिम झाल्यानंतर, गुंतवणूकदार BSE, NSE आणि रजिस्ट्रार लिंक इनटाइमच्या वेबसाइटवर आयपीओ अलॉटमेंट स्टेस्टेस चेक करू शकता. त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम किंवा GMP देखील 54.37% पर्यंत वाढला, जो आधीच्या 41.75% आणि बुधवारी बोलीच्या पहिल्या दिवशी 37% होता.
अर्बन कंपनी आयपीओ अलॉटमेंट सोमवार संध्याकाळी चेक येणार आहे. अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
Tax घोटाळे ओळखा, तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करा; कुठे कराल तक्रार इत्यंभूत माहिती
https://in.mpms.mufg.com/Initial_Offer/public-issues.html आणि https://www.nseindia.com/invest/check-trades-bids-verify-ipo-bids च्या वेबसाइटवर देखील तुम्ही अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता.
माहितीनुसार, Urban Company Limited चे शेअर्स BSE आणि NSE वर सुमारे 159 ला लिस्ट होण्याची शक्यता आहे. सध्या याचा GMP 56 रुपये आहे, जे त्याच्या IPO प्राइस ₹103 पेक्षा अंदाजे 54.37% जास्त आहे. यावरून या इश्यूची मजबूत लिस्टिंग होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.