टॅक्स घोटाळा कसा आहे ओळखण्यासाठी सोप्या टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
आयकर विवरणपत्र (ITR) फाईलिंगच्या सिझनसोबत करदात्यांवरील कागदपत्रांचे ओझे वाढतेच, पण त्याचवेळी टॅक्स घोटाळ्यांचा धोका देखील वाढतो. सायबर गुन्हेगार या काळातील गोंधळ, अंतिम मुदतीची भीती आणि टॅक्स परताव्याच्या आनंदाचा गैरफायदा घेतात. ते लोकांना वैयक्तिक माहिती उघड करण्यास, दुर्भावनापूर्ण लिंक्सवर क्लिक करण्यास किंवा बनावट शुल्क भरण्यास प्रवृत्त करतात.
परिणामी वापरकर्त्यांना फिशिंगच्या प्रयत्नांना बळी पडण्याचा, ओळख चोरीचा किंवा आर्थिक नुकसानीचा धोका संभवतो. सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गुन्हेगार टॅक्स व्यावसायिक, सरकारी संस्था किंवा परतावा सेवा यांचे सोंग आणून वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा, पैसे किंवा टॅक्स परतावा चोरतात. ते भीती, तातडीची गरज किंवा आकर्षक ऑफर्सचा वापर करून करदात्यांना संवेदनशील माहिती उघड करण्यास प्रवृत्त करतात.
आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर
सामान्य टॅक्स घोटाळ्यांची उदाहरणे:
“तुमच्यावर टॅक्स थकीत आहे आणि अटक टाळण्यासाठी त्वरित भरा.”
“तुमचा टॅक्स परतावा (रिफंड ) त्वरित मिळवा, नाहीतर तो कालबाह्य होईल.”
“तुमचे पॅन/आधार तपासणीखाली आहे.”
“तुमच्या ITR मध्ये त्रुटी आहेत; तुमचे तपशील त्वरित तपासा.”
New GST Rates: 22 सप्टेंबरपासून महाग होणार ‘या’ वस्तू, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा यादी
नक्की काय घडते?
करदाते टॅक्स घोटाळे ओळखण्यासाठी काही सामान्य धोक्याची चिन्हे वापरू शकतात, जसे की: टॅक्स अधिकाऱ्यांकडून असल्याचा दावा करणारे अनपेक्षित कॉल्स, ईमेल किंवा मेसेज; तातडीच्या धमक्या किंवा अवास्तव अंतिम मुदत; असामान्य पेमेंट पद्धतींची मागणी; खूपच आकर्षक वाटणाऱ्या परताव्याच्या ऑफर्स आणि ओटीपी, पिन किंवा वापरकर्त्याच्या पासवर्डची मागणी.
महत्त्वाच्या टिप्स
फोनेपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी अशा घोटाळ्यांना बळी पडण्यापासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. करदाते स्त्रोताची पडताळणी करून या घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. अधिकृत टॅक्स संवाद केवळ @gov.in ने समाप्त होणाऱ्या ईमेल पत्त्यांवरून येतात. आयकर विभाग कधीही SMS किंवा फोन कॉलद्वारे वैयक्तिक माहिती विचारत नाही.
टॅक्स भरण्यासाठी केवळ incometax.gov.in सारखे विश्वसनीय प्लॅटफॉर्म किंवा विश्वासार्ह व्यावसायिकांची मदत घ्यावी. कोणत्याही अनव्हेरिफाइड थर्ड-पार्टी साइट किंवा अनोळखी लिंक्स टाळाव्यात. ओटीपी किंवा पासवर्ड कधीही शेअर करू नये, कारण टॅक्स अधिकारी कधीही ओटीपी, पिन किंवा बँकिंग पासवर्ड मागत नाहीत. याव्यतिरिक्त, टॅक्स भरणा सॉफ्टवेअर आणि वित्तीय ॲप्सवर अपडेटेड अँटीव्हायरस आणि अँटी-मालवेअर प्रोग्राम वापरून आपले सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत ठेवावे.
कुठे आणि कशी तक्रार करावी?
जर तुम्हाला फोनेपेवर अशा प्रकारच्या घोटाळ्याचा अनुभव आला असेल, तर तुम्ही त्वरित फोनेपे ॲपवर तक्रार करू शकता किंवा ग्राहक सेवा क्रमांक 080-68727374 / 022-68727374 वर कॉल करू शकता, किंवा फोनेपेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर तक्रार नोंदवू शकता.
शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राईम सेलमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राईम सेल हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधू शकता. तुम्ही दूरसंचार विभागाशी (DOT) संपर्क साधून संचार सारथी पोर्टलवरील ‘चक्षू’ सुविधेद्वारे संशयास्पद मेसेज, कॉल्स किंवा व्हॉट्सॲप फसवणुकीची तक्रार करू शकता. तुम्ही फोनेपे तक्रार निवारण पोर्टलवर देखील तक्रार दाखल करू शकता.