Stock Market Today: घसरणीसह होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या
२३ जून रोजी आज आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे? शुक्रवारी शेअर बाजारातील तेजीनंतर आज बाजारात काय परिस्थिती असणार आहे? तज्ज्ञांनी आजच्या शेअर बाजाराविषयी काय अंदाज वर्तवला आहे, याबाबत आता आपण जाणून घेऊया. आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे. याबाबत तज्ज्ञांनी देखील काही माहिती दिली आहे. शिवाय आज गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स महत्त्वाचे ठरणार, याबाबत देखील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
जागतिक बाजारपेठेत संमिश्र वातावरण असल्याने 23 जून रोजी आज सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी पहायला मिळाली. बेंचमार्क निफ्टी ५० २५,१०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स १,०४६.३० अंकांनी म्हणजेच १.२९% ने वाढून ८२,४०८.१७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३१९.१५ अंकांनी म्हणजेच १.२९% ने वाढून २५,११२.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
जेएसडब्ल्यू एनर्जी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ग्रॅन्युल्स इंडिया, ओएनजीसी, बँक ऑफ इंडिया, बायोकॉन, स्मॉल फायनान्स बँक हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची शिफारस केली. ज्यामध्ये येस बँक , सुझलॉन एनर्जी , एबीएफआरएल, सेगिलिटी इंडिया, एसजेव्हीएन आणि सेगिलिटी इंडिया यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना येस बँक, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि पर्सिस्टंट सिस्टम्स हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर
स्टॉक मार्केट टुडेचे सह-संस्थापक व्हीएलए अंबाला यांनी काही तांत्रिक माहिती दिली, ते म्हणाले की, “या सत्रात निफ्टीला २५,००० ते २४,९५० दरम्यान आधार मिळेल आणि २५,२६० ते २५,३०० दरम्यान प्रतिकार जाणवेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.” तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, वेल्सपन कॉर्प लिमिटेड, टोरेंट पॉवर लिमिटेड आणि आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या स्टॉक्सची शिफारस केली आहे.