Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर
हल्ली बाजारात अॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. या फोनमध्ये असे अनेक फीचर्स असतात, जे युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे ठरतात आणि या फीचर्समुळे युजर्सची काम देखील सोपी होतात. असंच एक फीचर म्हणजे कॉल रिकॉर्डिंग. आपल्या स्मार्टफोनमधील कॉल रिकॉर्डिंग फीचर आपल्यासाठी प्रचंड फायद्याचं असतं. एखादा महत्त्वाचा फोन असेल तर अशावेळी आपल्याला या फीचरचा फायदा होतो.
Samsung ला टक्कर देणार Honor, या दिवशी लाँच करणार नवा स्मार्टफोन! असे आहेत खास फिचर्स
कॉल रेकॉर्डिंग फीचर तुम्हाला अशावेळी फायद्याचं ठरत जेव्हा तुम्हाला कॉलवरील संभाषण पुन्हा ऐकायचे असेल किंवा रेकॉर्ड म्हणून ठेवायचे असेल. पण या फीचरमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा तुम्ही या फीचरचा वापर करून कॉल रेकॉर्ड करता, तेव्हा समोरील व्यक्तिला अलर्ट पाठवला जातो. त्यामुळे समोरील व्यक्तिला देखील समजतं की आपला कॉल रेकॉर्ड केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनमधील कॉल रेकॉर्डिंग फीचरमध्ये गुगलने काही काळापूर्वी मोठा बदल केला आहे. या बदलानंतर आता जेव्हाही कॉल रेकॉर्ड केला जातो, तेव्हा समोरील व्यक्तिला अलर्ट व्हॉइस मेसेज मिळतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला आधीच कळते की हा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. पण हा अलर्ट व्हॉइस मेसेज न पाठवता देखील आपण कॉल रेकॉर्ड करू शकतो. होय, असं एक फीचर आपल्या स्मार्टफोनमध्ये आहे, याच फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. स्मार्टफोनमधील हे हिडन फीचर युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही कोणत्याही व्यक्तिचा कॉल रेकॉर्ड करू शकता आणि त्या व्यक्तिला समजणार देखील नाही. म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या नकळत कॉल रेकॉर्ड करू शकता, पण यासाठी तुम्हाला फक्त सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.
ही सेटिंग चालू केल्यानंतर कॉल रेकॉर्ड करताना समोरच्या व्यक्तिला ऑटोमॅटिक व्हॉइस डिस्क्लेमर ऐकू येणार नाही. जर या सेटिंगचा वापर केला नाही तर कॉलवरील समोरच्या व्यक्तिला हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे, असा एक अलर्ट पाठवला जातो. पण या सेटिंगनंतर अलर्टऐवजी, फक्त एक बीप आवाज ऐकू येईल. हा बीप ऐकून, समोरच्या व्यक्तीला कॉल रेकॉर्डिंग चालू आहे हे समजू शकणार नाही.