Stock Market Today: शेअर बाजारावर आज होणार या घटकांचा परिणाम, निफ्टीसाठी हा स्तर ठरणार महत्त्वाचा
शेअर बाजारात गुरुवारी 29 मे रोजी मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. मात्र यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात 29 मे 2025 रोजी मोठ्या तेजीने झाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्हीही हिरव्या रंगात उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 504.57 अंकांनी वाढून 81,816.89 वर पोहोचला तर निफ्टी 137.25 अंकांनी वाढून 24,889.70 वर पोहोचला होता.
शेअर बाजारातील कालच्या चढउतारानंतर आज बाजार कसा असणार, गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान, याबाबत तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सेक्टर रोटेशन आणि स्टॉक स्पेसफिक अॅक्शन, Q4 रिजल्ट्स, मायक्रो इकोनॉमी संकेत आणि अमेरिका ट्रॅरिफवरील बंदी या सर्व घटकांमुळे आज निफ्टी आणि सेन्सेक्स एका विशिष्ट श्रेणीसह व्यवहार करणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुरुवारी 29 मे रोजी सेन्सेक्स 320.70 किंवा 0.39 टक्के वाढीसह 81,633.02 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी काल 50 इंडेक्स 81.15 अंक किंवा 0.33 टक्के वाढीसह 24,833.60 च्या पातळीवर बंद झाला. आजची परिस्थिती काय असणार आहे. आज शेअर बाजाराल कशा प्रकारे सुरुवात होऊ शकते, याबद्दल जाणून घेऊया.
गुरुवारी NSE IX वर गिफ्ट निफ्टी 10 अंक किंवा 0.04 टक्के वाढीसह 24,947 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्यामुळे आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स देखील सपाट पातळीवर सुरुवात करू शकतात.
निफ्टी 50 इंडेक्ससाठी पुढची महत्त्वपूर्ण पातळी 24,670 असणार आहे. जर आज निफ्टी या पातळीपेक्षा खाली गेला तर एक मोठा बदल पहायला मिळू शकते, आजची पातळी 24,400 किंवा 24,300 पर्यंत घसरू शकते.
X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन
गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार वाढीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं. याचे मुख्य कारण म्हणजे संघीय न्यायालयाने लिबरेशन डे टॅरिफवर घातलेली बंदी. या बंदीमुळे अमेरिकन बाजारात तेजी आहे. याशिवाय, तिमाही निकालांनंतर एनव्हीडियाच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. काल, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 117.03 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी वाढून 42,215.73 वर बंद झाला, तर &P 500 निर्देशांक 23.62 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांनी वाढून 5,912.17 वर बंद झाला. त्याच वेळी, नॅस्डॅक 74.93 अंकांनी किंवा 0.39 टक्क्याने वाढून 19,175.87 वर बंद झाला.