X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन
एलन मस्कचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. एक्सवर शेअर केलेली माहिती सहसा अधिकृत मानली जाते. शिवाय राजकारणी आणि नेतेमंडळी देखील X वर सतत काही ना काही पोस्ट करत असतात. त्यामुळे X चे युजर्स दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या X ला आता अधिक पावरफुल बनवलं जाणार आहे, यासाठी X चा मालक एलन मस्क प्रयत्न करत आहे.
अरे देवा! Google Photos चं स्टोरेज झालं फुल्ल? एक्सपर्टच्या या Smart Tricks करणार तुमची मदत
एलन मस्कला X ला एव्हरिथिंग अॅप बनवायचं आहे, म्हणजेच अगदी फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत लोकं X वर सर्व काही करू शकणार आहेत. यासाठीच मस्क प्रयत्न देखील करत आहे. एलन मस्क लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर डिजिटल पेमेंट सर्विस X Money सुरु करणार आहे. Tesla चे सीईओ Elon Musk गेल्या अनेक महिन्यांपासून पेमेंट सर्विस X Money बाबत पोस्ट करत आहेत. मात्र ही सेवा कधी सुरु केली जाणार, त्याची लाँच डेट काय असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
मात्र पेमेंट सर्विस X Money बाबत एलन मस्कचं असं म्हणणं आहे की, त्यांचं नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार आहे. ते लवकरच बीटा टेस्टिंग सुरु करणार आहेत. X वर पेमेंट सर्विस सुरु करण्यासाठी मस्कने स्पेशल प्रोजेक्ट देखील सुरु केला आहे. ही पेमेंट सर्विस त्या स्पेशल प्रोजेक्टचा एक भाग आहे. लवकरच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स एव्हरिथिंग अॅप म्हणून ओळखलं जाणार आहे. जिथे युजर्सना सर्व सुविधा मिळणार आहेत.
X वर @teslaownerssv यूजर आईडीने एक पोस्ट शेअर करत दावा केला आहे की, X Money सर्विस लवकरच सुरु केली जाणार आहे, पेमेंट आणि बँकिंग सर्विससह एलन मस्क X ला एव्हरिथिंग अॅप बनवणार आहे. X वर पोस्ट शेयर करत मस्कने सांगितलं आहे की, लिमिटेड अॅक्सेससब के लवकरच बीटा टेस्टिंग सुरु होणार आहे.
Jio घेऊन आलाय धमाकेदार ऑफर! 343 रुपयांच्या मंथली खर्चात मिळणार ओटीटी आणि अनलिमिटेड 5G ची मजा!
समोर आलेल्या काही अहवालांवर विश्वास ठेवला तर X Money प्लॅटफॉर्म क्रिप्टो ट्रांसजेक्शनला सपोर्ट करणार आहे. यासोबतच हे बिटकॉइनसह देखील लिंक केलं जाणार आहे. Musk एक्सवर पेमेंट सर्विस सुरु करण्यासाठी Visa सह काम करत आहेत.
एलन मस्कने ऑक्टोबर 2022 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केलं आणि त्याचं नाव एक्स ठेवलं. तेव्हापासून तो X वर पेमेंट सेवा सुरू करण्यावर काम करत आहेत. यासाठी त्यानी अमेरिकेतील 41 राज्यांमध्ये आवश्यक परवाने देखील मिळवले आहेत. ट्विटर खरेदी केल्यापासून, तो सतत त्यात नवीन वैशिष्ट्ये आणि बदल जोडत आहे.