Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Investment: गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च, सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी

एचएसबीसी म्‍युच्‍युअल फंडकडून एचएसबीसी गोल्ड ईटीएफ आणि एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड (एफओएफ) सह भारतात आपले पहिले एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) लाँच करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2026 | 06:30 PM
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च, सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च, सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी

Follow Us
Close
Follow Us:

एचएसबीसी म्युच्युअल फंडने एचएसबीसी गोल्ड ईटीएफ आणि एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड (एफओएफ) लाँच करण्याची घोषणा केली आहे. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ प्रत्यक्ष सोने किंवा सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करणारी आहे. तसेच एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करेल. या लाँचसह एचएसबीसी म्युच्युअल फंडने भारतात पहिल्यांदाच ईटीएफ क्षेत्रात प्रवेश केला आहे. या न्यू फंड ऑफर (एनएफओ) योजना या आठवड्यापासून गुंतवणुकीसाठी खुल्या होत आहेत.

एनएफओ कालावधी

एचएसबीसी गोल्ड ईटीएफ – १६ ते १८ मार्च २०२६
एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड – १९ ते २५ मार्च २०२६

या दोन्‍ही फंडचे व्‍यवस्‍थापन एचएसबीसी म्युच्युअल फंडचे दिपन पारेख यांच्याद्वारे केले जाईल. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करेल आणि या योजनेची कामगिरी सोन्याच्या देशांतर्गत किमतींच्या तुलनेत मोजली जाईल. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करेल. हे फंड गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची सोयीस्कर संधी उपलब्ध करून देतात.

 एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना, प्रताप सरनाईकांची माहिती

एचएसबीसी गोल्ड ईटीएफ आणि एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडच्या एनएफओ कालावधीदरम्‍यान गुंतवणूकदार किमान ५,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकतात. एचएसबीसी गोल्ड ईटीएफचे ट्रॅकिंग एरर्सच्‍या अधीन राहून खर्चापूर्वी गुंतवणुकीचे सोन्याच्या देशांतर्गत किमतींच्या कामगिरीचा मागोवा घेण्‍याचे उद्दिष्ट आहे, तर एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडचे एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्‍या माध्‍यमातून मिळणाऱ्या परताव्याच्या अनुषंगाने परतावा मिळवून देण्‍याचे उद्दिष्ट आहे.

एचएसबीसी गोल्ड ईटीएफची खरेदी-विक्री एनएसई आणि बीएसईवर केली जाईल, तर एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडमध्ये गुंतवणूकदार प्रत्‍यक्ष एकरकमी, एसआयपी, एसआयपी टॉप-अप, एसटीपी आणि एसडब्ल्यूपी पर्यायांद्वारे एएमसीसह गुंतवणूक करू शकतात.

एचएसबीसी गोल्ड ईटीएफ आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ९५ टक्‍के रक्‍कम सोने किंवा सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवेल आणि ५ टक्‍क्‍यांपर्यंत रक्‍कम मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये ठेवू शकेल. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ एफओएफ आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ९५ टक्‍के गुंतवणूक एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये करेल आणि ५ टक्‍क्‍यांपर्यंत मालमत्ता डेब्ट किंवा मनी मार्केट सिक्युरिटीज/फंड्समध्ये ठेवू शकेल. सोन्याचा सध्‍याचा भाव किंवा या मालमत्ता वर्गाचा भविष्यातील कल काहीही असला तरीही ही योजना अंतर्निहित योजनेत गुंतवणूक कायम ठेवेल.

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत एचएसबीसी म्युच्युअल फंडचे सीईओ, कैलास कुलकर्णी म्हणाले, ”भारतातील घराघरांमध्ये दीर्घकाळापासून महत्त्वाचे स्थान असलेले सोने आता गुंतवणुकीचे मालमत्ता वाटप करण्यासाठी महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जात आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे शक्य झाले आहे. बाजारपेठेतील अस्थिरतेविरुद्ध संरक्षण म्हणून काम करण्याची सोन्याची अद्वितीय क्षमता सोन्याला दीर्घकालीन मालमत्ता जतन करण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक बनवते. आमच्या गोल्ड ईटीएफच्‍या माध्‍यमातून गुंतवणूकदार आता प्रत्यक्ष सोने साठवण्याच्या किंवा हाताळण्याच्या गुंतागुंतीशिवाय सोन्यातील गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात. हा दृष्टिकोन गुंतवणूकदारांना अधिक स्थिर पोर्टफोलिओ तयार करण्यास आणि आत्मविश्वासाने आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करतो.”

एचएसबीसी म्युच्युअल फंडचे इक्विटीचे सीआयओ वेणुगोपाल मंगत म्हणाले, ”सोन्याचा इक्विटीशी असलेला कमी संबंध सोन्‍याला मौल्यवान विविधता आणणारा घटक आणि बाजारपेठेत मोठी अस्थिरता असताना प्रभावी सुरक्षा कवच बनवतो. सोन्यामध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करत गुंतवणूकदार आपल्या एकूण पोर्टफोलिओचा जोखीम आणि दीर्घकालीन स्थिरतेचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना देशांतर्गत सोन्याच्या किमतीतील बदलांचा लाभ घेण्यासाठी कार्यक्षम आणि स्थिर मार्ग उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे त्यांच्या व्यापक वैविधीकरण आणि जोखीम व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांना मदत होईल.

गोल्‍ड ईटीएफमध्‍ये गुंतवणूक का करावी

अस्थिरतेविरुद्ध संरक्षण: इतर मालमत्ता वर्गांशी असलेला सोन्याचा कमी संबंध पाहता बाजारपेठेतील अस्थिरतेविरुद्ध सोने प्रभावी सुरक्षा कवच म्हणून काम करू शकते.
कामगिरीचे अनुकूलन: मालमत्ता वर्गांचे योग्य मिश्रण दीर्घकाळापर्यंत अनुकूल परिणाम मिळवण्यास मदत करू शकते.

शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

Web Title: Hsbc gold etf launch india new gold investment opportunity benefits risks guide 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Gold
  • HSBC
  • investment

संबंधित बातम्या

‘या’ बँकेच्या 20000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर लटकती तलवार, AI In माणसांची गच्छंती!
1

‘या’ बँकेच्या 20000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर लटकती तलवार, AI In माणसांची गच्छंती!

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच; अवघ्या 10 रुपयांत गुंतवणुकीची सुरुवात
2

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच; अवघ्या 10 रुपयांत गुंतवणुकीची सुरुवात

“ब्रिटनमधील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक…”: CM Devendra Fadnavis यांचे आवाहन
3

“ब्रिटनमधील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक…”: CM Devendra Fadnavis यांचे आवाहन

Mutual Funds: Share Market मध्ये तंगी, ‘या’ म्युच्युअल फंडने वर्षभरात दिला तब्बल 84% पेक्षा जास्त रिटर्न
4

Mutual Funds: Share Market मध्ये तंगी, ‘या’ म्युच्युअल फंडने वर्षभरात दिला तब्बल 84% पेक्षा जास्त रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.