आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना अलर्ट; 'या' दिवशी ही सेवा राहणार बंद!
एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. देशातील एका बड्या बँकेने एफ डी व्याजदरात सुधारणा केली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन दर 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. हे सुधारित व्याजदर 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांना कमाल 7.80 टक्के व्याजदर देत आहे.
आयसीआयसीआय बँकेचे 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याज दर
– 7 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
– 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 टक्के
– 46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
– 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 टक्के
– 91 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
– 185 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
– 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
– एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के
– 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.80 टक्के
– 18 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
– 2 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
– 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.40 टक्के.
– 5 वर्षांची कर बचत एफडी : 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.